बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर जेव्हा ब्रेकअप होतं, तेव्हा अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मानसिक त्रासासोबत शारीरिक त्रासही होतो. अनेकांना असही वाटतं की, ब्रेकअपच्या चिंतेमुळे तुमचं वजन वाढत आहे. तर तुम्ही चुकीचा विचार करताय.
एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, भावनात्मक रूपाने आयुष्यात चढउतार आल्यानंतर ब्रेकअप झाल्यावर सरासरी लोकांचं वजन वाढत नाही. अभ्यासकांनुसार, लोक कधी-कधी खाण्याचा वापर नकारात्मक विचारांशी निपटण्यासाठी करतात आणि यानंतर अनहेल्दी फूड त्यांच्या पसंतीच्या पदार्थाच्या यादीत येतात.
Journal of the Evolutionary Studies Consortium मध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. यासाठी अभ्यासकांनी दोन रिसर्च पूर्ण केले. जेणेकरून हे जाणून घेण्यासाठी की, ब्रेकअपनंतर लोकांचं वजन वाढतं.
पहिल्या रिसर्चसाठी अभ्यासकांनी ५८१ लोकांचा सहभागी करून घेतले होते. त्यांच्यावर लक्ष ठेवलं की, त्यांनी एका वर्षातच ब्रेकअप केलं का आणि त्याने त्यांचं वजन वाढलं का? हे जाणून घेतलं. यात ६२.७ टक्के लोक म्हणाले की, त्यांच्या वजनावर कोणताही प्रभाव पडला नाही.
दुसऱ्या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी २६१ लोकांचा रिसर्चमध्ये सहभाग करून घेतला. या लोकांना विचारण्यात आले की, त्यांचं लॉंगटर्म रिलेशनशिप कधी तुटल्याचा अनुभव आला का आणि यामुळे त्यांचं वाढलं किंवा घटलं का?
सर्व्हेत लोकांना असेही विचारण्यात आले की, त्यांच्या एक्स पार्टनरचा अॅटिट्यूड कसा होता आणि रिलेशनशिपमध्ये ते कसे कमिटेड होते. कुणी ब्रेकअपची सुरूवात केली. यातील ६५.१३ टक्के लोकांनी हे मान्य केलं की, रिलेशनशिप तुटल्यानंतर त्यांच्या वजनावर कोणताच परिणाम झाला नाही.