वापरलेल्या ग्रीन टी बॅगचा 'या' पद्धतीने पुन्हा करा वापर, तुम्हालाही नसेल माहीत फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 09:28 IST2024-04-17T09:27:35+5:302024-04-17T09:28:10+5:30
Tea bag reuse tips : अनेकांना हे माहीत नसतं की, वापरलेल्या टी बॅगचे बरेच फायदे मिळू शकतात. त्याचा वापर कसा करायचा हेच आज आम्ही सांगणार आहोत.

वापरलेल्या ग्रीन टी बॅगचा 'या' पद्धतीने पुन्हा करा वापर, तुम्हालाही नसेल माहीत फायदे!
Tea bag reuse tips : बरेच लोक आजकाल वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ग्रीन टी चं सेवन करतात. एक्सपर्ट सांगतात की, यातून अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात आणि शरीरातील चरबीही कमी होते. ग्रीन टी चं सेवन केल्यावर कुणीही टी बॅग लोक फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वापरलेल्या टी बॅगचे बरेच फायदे मिळू शकतात. त्याचा वापर कसा करायचा हेच आज आम्ही सांगणार आहोत.
दुर्गंधी पळवा
अनेकदा कपाटामधून दुर्गंधी येते. त्यामुळे कपड्यांचाही वास येऊ लागतो. अशात ही दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी बॅगचा वापर करू शकता. ग्रीन टी बॅग उघडून उन्हात वाळत घाला आणि नंतर त्यातील पावडर एका कॉटनच्या कपड्यात बांधून कपाटात ठेवा. याने दुर्गंधी दूर होईल.
झाडांना पोषण
घरात लावलेल्या झाडांना पोषण देण्यासाठी तुम्ही ग्रीन टी बॅगचा वापर करू शकता. याने झाडांची चांगली वाढ होते. त्यासोबतच वाळलेल्या ग्रीन टी पावडरचा वापर तुम्ही फ्रिजची दुर्गंधी दूर करण्यासाठीही वापरू शकता.
केसांची चमक वाढवा
ग्रीन टी च्या माध्यमातून तुम्ही तुमचे केसही चमकदार करू शकता. केस चमकदार करण्याची ही एक सोपी पद्धत आहे. यासाठी 1 ग्लास पाण्यात टी बॅग उकडून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर याने केस धुवा. याने केसांना चांगलं पोषणही मिळेल.
त्वचेसाठी फायदेशीर
तुम्ही सकाळी ग्रीन टी चं सेवन करत असाल तर तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळते आणि याने तुमची त्वचाही डिटॉक्स करण्यास मदत मिळते. त्वचेला आराम देण्यासाठी तुम्ही वापरलेल्या ग्रीन टी बॅगचा वापर करू शकता. टी बॅग्सचा तुम्ही डार्क सर्कल, लालसरपणा आणि सूजलेले डोळे यापासून सुटका मिळवण्यासाठी वापर करू शकता.