Ways to avoid gas or indigestion : उन्हाळ्याच्या दिवसात अपचनामुळे तुम्हालाही आंबट ढेकर येताहेत का?; जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 11:52 AM2021-03-27T11:52:20+5:302021-03-27T12:01:13+5:30

Ways to avoid gas or indigestion : ओव्हरइटिंगमुळे छातीत जळजळ होऊन आंबट ढेकर येतात. जेव्हा जेव्हा गॅस, अपचनाची समस्या होते तेव्हा खाल्लेलं अन्न पुन्हा वर यायला सुरूवात होते. 

Ways to avoid gas or indigestion : Symptoms and ways to avoid gerd acid reflux heartburn gas or indigestion | Ways to avoid gas or indigestion : उन्हाळ्याच्या दिवसात अपचनामुळे तुम्हालाही आंबट ढेकर येताहेत का?; जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय

Ways to avoid gas or indigestion : उन्हाळ्याच्या दिवसात अपचनामुळे तुम्हालाही आंबट ढेकर येताहेत का?; जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय

Next

आजकाल लोकांना  दैनंदिन जीवनात साध्या वाटत असलेल्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या खराब जीवनशैलीमुळे उद्भवत असून गॅस,  अपचन आणि आंबट ढेकर Gastroesophageal reflux disease (GERD) हे खूप सामान्य झालं आहे, सिगारेट पिणं, ओव्हरइटिंग यामुळे छातीत जळजळ होऊन आंबट ढेकर येतात. जेव्हा जेव्हा गॅस, अपचनाची समस्या होते तेव्हा खाल्लेलं अन्न पुन्हा वर यायला सुरूवात होते. 

पोट आणि अन्ननिलकेच्यामध्ये एक एक वेल्व असते. याद्वारे अन्न आणि एसिड फूड पाईपमध्ये परत जाण्यापासून रोखता येऊ शकतं. जेव्हा हे योग्यरित्या काम करत नाही  तेव्हा अपचन, गॅस, आंबट ढेकरांचा सामना करावा लागतो. PSRI हॉस्पिटल, दिल्लीतील सिनियर कंसल्टेंट आणि गॅस्ट्रो एंड लिव्हर ट्रांसप्लांट सर्जन डॉक्टर मनोज गुप्ता यांनी याची लक्षणं आणि बचावाचे उपाय सांगितले आहेत. 

लक्षणं

तोंडात आंबट पाणी येतं.

दातांचा रंग बदलू लागतो. 

बोलताना खोकला येतो. 

छातीत जळजळ होणं.

तोंडात कडवटपणा वाटणं.

या कारणांमुळे उद्भवते समस्या

खराब जीवनशैलीमुळे फूड पाईप आणि पोटातील वेल्व  कमकुवत होतं. 

वजन वाढल्यामुळे ही समस्या उद्भवते.

जर  कोणतीही व्यक्ती जास्त प्रमाणात मद्यपान किंवा धुम्रपान करत असेल तर त्या व्यक्तीलाही असा त्रास होऊ  शकतो. 

ही समस्या अशा लोकांनासुद्धा होते. ज्यांची मान लहान असते. 

गर्भावस्थेदरम्यानही असा त्रास होतो.

तिखट पदार्थ खाल्ल्यास पोटाचा त्रास होतो. 

दिवसभर बसून काम करत असलेल्यांना याचा सामना करावा लागतो. 

आपल्यालाही गॅस अपचन आणि आंबट ढेकरांची समस्या असल्यास ते टाळण्यासाठी आपण काही उपायांचा अवलंब करू शकता. परंतु ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणे योग्य आहे. या समस्येपासून काही उपायांचा अवलंब करून तुम्ही बचाव करू शकता पुढीलप्रमाणे...

१) आपल्यास ही समस्या असल्यास आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करुन सुधारणा करू शकता. दररोज व्यायाम करा आणि अधिक मसालेदार अन्नाचे सेवन करणे थांबवा.

२) जास्त वजन असल्यामुळे देखील या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आपले वजन कमी झाल्यास ही समस्या आपोआपच नष्ट होईल.

CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा 

३) जे लोक मद्यपान करतात आणि धूम्रपान करतात त्यांना ही समस्या टाळण्यासाठी या वाईट सवयी सोडून द्याव्या लागतात.

४) रात्रीचं जेवण झोपण्याच्या २ तास आधी करा. जेवणानंतर 30 किंवा 60 मिनिटे कोणत्याही प्रकारचे पेय पिऊ नका.

 तुम्हीसुद्धा सकाळी उशीरा नाष्ता करताय? मग 'हा' आजार कधी होईल कळणारही नाही, वेळीच तब्येत सांभाळा

५) सकाळी चांगला पोटभर नाश्ता करा, दुपारच्या जेवणामध्ये थोडे खा आणि रात्रीचे जेवणही कमीत कमी घ्या

६)  गॅस आणि आंबट ढेकरांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, झोपताना आपली मान थोडी उंचावर ठेवा. यासाठी, आपली मान 15 डिग्री पर्यंत असावी.

Web Title: Ways to avoid gas or indigestion : Symptoms and ways to avoid gerd acid reflux heartburn gas or indigestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.