'या' संकेतांवरून समजतं लिव्हरवर पडत आहे जास्त दबाव, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 11:48 IST2023-06-28T11:45:37+5:302023-06-28T11:48:32+5:30
Symptoms of Liver damage: अनेकदा लिव्हरवर व्हायरल किंवा पॅरासाइट हल्ला करतात ज्यामुळे लिव्हर डॅमेज होऊ लागतं. लिव्हर खराब होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. ज्यात जेनेटिक कारणही आहे.

'या' संकेतांवरून समजतं लिव्हरवर पडत आहे जास्त दबाव, वेळीच व्हा सावध!
Symptoms of Liver damage: लिव्हर आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. लिव्हरला शरीराची फॅक्टरी म्हणतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लिव्हर शरीरासाठी 500 पेक्षा जास्त कामं करतं. लिव्हर प्रोटीन, कोलेस्ट्रॉल, हार्मोनसहीत अनेक महत्वाचे केमिकल्स तयार करतं. लिव्हर आहारातून पोटात जाणारे सगळे विषारी पदार्थ बाहेर काढतं. पण आजकालच्या लोकांच्या चुकीच्या सवयीमुळे लिव्हरवर जास्त दबाव पडत आहे. पुढे ही समस्या मोठी गंभीर स्थिती तयार करते.
अनेकदा लिव्हरवर व्हायरल किंवा पॅरासाइट हल्ला करतात ज्यामुळे लिव्हर डॅमेज होऊ लागतं. लिव्हर खराब होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. ज्यात जेनेटिक कारणही आहे. त्याशिवाय अल्कोहोल लिव्हरला सगळ्यात जास्त खराब करतं. सिरोसिसचं एक मोठं कारण अल्कोहोल आहे. अशात तुम्हाला हे समजलं पाहिजे की, लिव्हरवर जास्त दबाव पडत आहे. चला जाणून घेऊ काही संकेत...
1) डॉक्टरांनुसार, तुम्हाला जर काही दिवसांपासून सतत थकवा जाणवत असेल, आराम केल्यावर किंवा औषधं घेतल्यावरही ही समस्या दूर होत नसेल हा लिव्हर डॅमेज होत असल्याचं संकेत असू शकतो. लिव्हर खराब झाल्यावर शरीराला योग्य एनर्जी मिळत नाही आणि एनर्जी स्टोरही होत नाही. त्यामुळेच सतत थकवा आणि कमजोरी जाणवते.
2) जर लिव्हरवर जास्त दबाव पडत असेल किंवा त्यावर व्हायरस किंवा पॅरासाइटने हल्ला केला असेल तर त्वचा आणि डोळ्यांखाली पिवळेपणा दिसू लागतो. पिवळेपणा दिसणं जॉन्डिस किंवा हेपेटायटिस बी किंवा सी सुद्धा असू शकतो. हे दोन्ही आजार लिव्हर डॅमेज करतात.
3) जर पोटात सतत वेदना होत असेल तर हा लिव्हर डॅमेजचा संकेत असू शकतो. जर आतड्यांमध्ये सूज असेल त्याचा थेट प्रभाव लिव्हरवर पडतो. यामुळे अन्न पचवण्यासाठी लिव्हरमधून निघणारे एंजाइम कमी बनू लागतात. अशात पोटात दुखतं.
4) लिव्हर जेव्हा जास्त खराब होतं तेव्हा पाय आणि टाचांवरही प्रभाव बघायला मिळतो. याने पाय आणि टाचांवर सूज येते. यात वेदनाही होतात. लिव्हरचं फंक्शन कमजोर होतं. त्यामुळे पाय आणि टाचांवर सूज येते.
5) विष्ठेचा रंग मळका येत असेल तर समजून घ्या की, लिव्हर डॅमेजचा संकेत आहे. अशात वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. जेव्हा लिव्हरमध्ये एंजाइम आणि अॅसिड तयार होत नाही किंवा कमी बनतं तेव्हा विष्ठेचा रंग मळका होतो.