जास्त काळ जगायचंय? हावर्डच्या तज्ज्ञांनी सांगितला जास्त जगण्याचा फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 14:43 IST2021-06-03T14:43:13+5:302021-06-03T14:43:55+5:30
आपण काय खातो याकडे लक्ष दिलं पाहिजे. हार्वर्ड युन्हीवर्सीटीने यावर संशोधन केलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार आपण कोणत्या भाज्या आणि फळे खावीत ज्यामुळे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो हे सांगितलेलं आहे.

जास्त काळ जगायचंय? हावर्डच्या तज्ज्ञांनी सांगितला जास्त जगण्याचा फंडा
निरोगी आयुष्य जगणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी आपण बरीच धडपड देखील करतो. रोज वेळेत उठणं, जेवणाच्या वेळा पाळणं, भरपूर पाणी पिणं, व्यायाम करणं अशा गोष्टी आपण करतो. या सर्वात आपण काय खातो याकडे लक्ष दिलं पाहिजे. हार्वर्ड युन्हीवर्सीटीने यावर संशोधन केलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार आपण कोणत्या भाज्या आणि फळे खावीत ज्यामुळे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो हे सांगितलेलं आहे. तसेच त्यामुळे आपली आयुमर्यादा देखील वाढते. चला पाहुया अशा कोणत्या भाज्या व फळे आहेत जे खाल्ल्यामुळे आपली आयुमर्यादा वाढते.हावर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी २० लाख लोकांवर संशोधन केलं. त्यानंतर जे परीणाम आले त्यावर त्यांनी विश्लेषण केलं आहे.
- पालेभाज्या
- बेरीज
- आणि बीटा कॅरटीन जास्त असलेल्या भाज्या.
- तसेच बटाट्यासारखी स्टार्च असलेल्या भाज्या, फळे बिलकूल खाऊ नयेत. यामुळे आपल्याला अपाय तर होतोच पण आपले आर्युमान वाढण्यात अडथळा येतो.
- याच सोबत तुम्ही नट्स खाऊ शकता. नट्समध्ये भरपूर प्रमाणात उर्जा असते. तसेच असेही काही घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदाच होतो. तसेच नट्स खाणाऱ्या लोकांचे वजनही कमी राहते.
- तुम्ही याचसोबत दही किंवा योगर्ट, पनीरही खाऊ शकता.
मेडिटेरियन डाएटचे महत्व
सद्य काळात अनेक तज्ज्ञ मेडिटेरियन डाएटचा सल्ला देतात. यामध्ये ऑलीव्ह ऑईल, बीन्सचा समावेश असतो. संशोधनातून समोर आले की ज्या स्त्रिया मेडिटेरियन डाएट करतात त्यांचे आरोग्य अधिक चांगले राहते.