मस्तच! चालण्याच्या पद्धतीत 'असा' बदल केला तर वेगाने कमी होईल वजन, रिसर्चमधून दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 14:19 IST2024-07-03T14:19:17+5:302024-07-03T14:19:48+5:30
Walking Benefits: जेवण केल्यावर चालण्याचा सल्ला दिला जातो कारण चालल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि जेवण चांगल्या पद्धतीने पचन होतं. पण याचा सगळ्यांनाच फायदा मिळतो असं नाही.

मस्तच! चालण्याच्या पद्धतीत 'असा' बदल केला तर वेगाने कमी होईल वजन, रिसर्चमधून दावा
Walking Benefits: जगभरातील लोक वाढत्या वजनामुळे हैराण झाले आहेत. वाढतं वजन कमी करण्यासाठी नियमित एक्सरसाइज, योग्य आहार आणि योग्य लाइफस्टाईलबाबत सांगितलं जातं. रनिंग करणं आणि चालण्यानेही तुम्ही वजन कमी करू शकता. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना जेवण केल्यावर चालण्याचा सल्ला दिला जातो कारण चालल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि जेवण चांगल्या पद्धतीने पचन होतं. पण याचा सगळ्यांनाच फायदा मिळतो असं नाही. अशात आता समोर आलं आहे की, चालण्याची पद्धत जर तुम्ही बदलली तर तुम्हाला वजन कमी करण्यास जास्त मदत मिळेल.
चालण्याची योग्य पद्धत
मॅसाचुसेट्स एमहर्स्ट यूनिवर्सिटीमध्ये नुकताच यावर रिसर्च करण्यात आला. यात सांगण्यात आलं आहे की, तुम्ही जर तुमच्या चालण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला तर वजन वेगाने कमी होऊ शकतं. रिसर्चनुसार, सतत एकसारखं चालल्याने किंवा एकसारख्या पद्धतीने चालल्याने वजन कमी होणार नाही. यासाठी जेव्हा तुम्ही वॉक करताना तेव्हा पावलं असमान टाका. म्हणजे पावलं कधी लहान तर कधी मोठी टाका. तेव्हाच कॅलरी वेगाने बर्न होतील. म्हणून रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, एकाच तालावर चालू नका. कधी लहान पावलं तर कधी मोठी टाका. सोबतच कधी वेगाने तर हळू चाला. असं केल्याने मेटाबॉलिज्म सिस्टीम सुधारेल आणि पचनक्रिया आणखी चांगली होईल. यानेच तुमचं वजनही कमी होईल.
वेगाने कॅलरी होतात बर्न
रिसर्चमध्ये अभ्यासकांना आढळलं की, चालताना जर तुम्ही चालणे, धावणे अशी पद्धत वापराल तर कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होतात. या रिसर्चमध्ये २४ वयाच्या काही तरूणांचा समावेश करण्यात आला होता. त्यांची चालण्याची पद्धत वेगवेगळी ठेवली. या दरम्यान त्यांची पावलं टाकण्याची लांबी वेगवेगळी ठेवली. ज्यामुळे त्यांच्या मेटाबॉल्जिमवर चांगला प्रभाव पडला.
चालताना स्टेप्स लहान मोठ्या टाकल्या तर वेगाने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला जर लवकर वजन कमी करायचं असेल तर नुसतं चालून फायदा नाही. चालण्याच्या पद्धतीत बदल करा. चालताना तुम्ही कधी वेगाने म्हणजे ब्रिस्क वॉक करा, काही मिनिटे रनिंग करा, काही मिनिटे छोटी पावलं टाकत चाला तर काही मिनिटे सामान्य चाला.