शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

चालणे... एक सहज व्यायाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 02:04 IST

नियमित व्यायाम आपल्या स्नायूंची ताकद आणि कार्य वाढवू शकतो ज्यामुळे ते अधिक कार्यक्षम बनतात

- डॉ. सायली सोनखेडकरनिष्क्रिय जीवनशैलीसंबंधित काही आजार म्हणजे हृदयविकाराचे सर्व प्रकार, मधुमेह (प्रकार -2) , संधिवात आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग हे आहेत. गतिहीन जीवनशैली, रोजच्या जीवनशैलीत शारीरिक श्रमाचा अभाव आणि शारीरिक स्वास्थ्याची कमतरता प्रामुख्याने हाइपो किनेटिक रोगांसाठी जबाबदार असते जसे की हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा आणि पाठदुखी. आपण निरोगी असाल किंवा आपल्याला फुफ्फुसाचा आजार असेल तरीही नियमित शारीरिक क्रिया आणि व्यायाम आयुष्याची गुणवत्ता सुधारते.चालणे ,धावणे अशा नियमित व्यायामाने ह्रदयरोग, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या आजारांची जोखीम कमी होते व फुफ्फुसे स्वस्थ ठेवण्यात मदत होते.व्यायाम करण्याचे काय फायदे आहेत?नियमित व्यायाम आपल्या स्नायूंची ताकद आणि कार्य वाढवू शकतो ज्यामुळे ते अधिक कार्यक्षम बनतात. ज्यायोगे आपल्या स्नायूंना कमी आॅक्सिजनची आवश्यकता भासते आणि ते कमी कार्बन डाय आॅक्साईड तयार करतात. दिलेल्या व्यायामासाठी आपल्याला श्वास घेण्यास आणि बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेल्या हवेचे प्रमाण हे त्वरित कमी करेल.व्यायामामुळे आपल्या संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होईल. यामुळे स्ट्रोक, हृदयविकार आणि नैराश्यासारख्या आजारांची जोखीम कमी होऊ शकते. मधुमेह (प्रकार 2) टाळण्यासाठी नियमित व्यायाम हा सर्वात महत्त्वाचा आहे.नियमित व्यायामाने आपले रक्ताभिसरण सुधारते आणि आपल्या हृदयाला मजबूत करते.व्यायाम म्हणजे काय?कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया व्यायाम म्हणून मोजली जाते. धावणे, पोहणे, टेनिस, व्यायामाचे रीतसर प्रशिक्षण किंवा सायकल चालविणे, चालणे तसेच छंदासारखे नियोजित खेळ व्यायाम असू शकतात.आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया जसे बागकाम, स्वच्छता करणे किंवा दुकानापर्यंत चालणे हा देखील व्यायाम आहे.दीर्घकालीन फुफ्फुसाचे आजार असलेले लोक नियमित व्यायाम करून त्यांच्या आजाराची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात.मी व्यायाम करताना माझ्या फुफ्फुसात काय होते?व्यायामादरम्यान, शरीरात दोन महत्त्वाचे अवयव काम करतात : हृदय आणि फुफ्फुसे. फुप्फुसे शरीरात आॅक्सिजन आणतात, ऊर्जा पुरवतात आणि कार्बन डायआॅक्साईड काढून टाकतात. व्यायाम करत असलेल्या स्नायूंना हृदय आॅक्सिजन पंप करते.जेव्हा आपण व्यायाम करतो आणि आपले स्नायू अधिक कठोर परिश्रम करतात तेव्हा आपले शरीर अधिक आॅक्सिजन वापरते आणि कार्बन डायआॅक्साईड तयार करते. या अतिरिक्त मागणीचा सामना करण्यासाठी व्यायामादरम्यान आपल्या श्वासाचा दर मिनिटास सुमारे 40-60 वेळा प्रतिमिनिट (100 लिटर हवा) एवढा वाढतो. आपले रक्ताभिसरण स्नायूंना आॅक्सिजन घेण्यासदेखील गती देते जेणेकरुन ते पुढे चालू राहू शकतील. म्हणून हृदय व फुफ्फुसे निरोगी आणि सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.बऱ्याच धावपटूंना दमा असतो आणि तरीही ते उच्च पातळीवर स्पर्धा करण्यास सक्षम असतात. दम्यासाठी वापरले जाणारे इनहेल्ड स्टेरॉइड स्प्रे आपण घेऊ शकता, ज्यावर कोणतेही प्रतिबंध नाहीत.ब्रोन्कोडायलेटर्स घेत असल्यास, व्यायाम-प्रेरित ब्रोन्कोकॉनस्ट्रिक्शन टाळण्यासाठी आपण सामान्यत: व्यायामापूर्वी 10 मिनिटे ते घ्यावेत. आपले डॉक्टर आपल्याला सल्ला देऊ शकतात. अ‍ॅलर्जिक सर्दी असल्यास, व्यायामाने रक्ताभिसरण वाढते व ह्यामुळे शरीरातून सर्व अ‍ॅलर्जन्स हलवण्यास आणि मूत्रपिंड व त्वचेतून बाहेर टाकण्यास मदत होते.नियमित व्यायामाचे फायदेआपल्याला आनंदी बनवते.वजन कमी करण्यात मदत होते.आपल्या स्नायू आणि हाडांसाठी चांगले आहे.आपली ऊर्जा पातळी वाढते.तीव्र आजाराचा धोका कमी होऊ शकतो.त्वचेचे आरोग्य चांगले होण्यास मदत होते.आपल्या मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होते.झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

(लेखिका एमबीबीएस आहेत)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स