जिभेवर ही लक्षणे दिसली तर समजा शरीरात झाली आहे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 13:16 IST2022-08-11T13:16:08+5:302022-08-11T13:16:21+5:30
Health Tips : हेल्दी राहण्यासाठी व्यक्तीला वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची गरज पडते. शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर अनेक प्रकारच्या समस्या होतात.

जिभेवर ही लक्षणे दिसली तर समजा शरीरात झाली आहे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता
Health Tips : व्हिटॅमिन ऑर्गेनिक कंपाउंड असतात ज्यांची गरज लोकांना फार कमी प्रमाणात असते. आपल्या शरीरात व्हिटॅमिनची निर्मित फार जास्त कमी होते. अशात ही व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांमधून भरून काढावी लागते. हेल्दी राहण्यासाठी व्यक्तीला वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची गरज पडते. शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर अनेक प्रकारच्या समस्या होतात.
अनेकदा शरीरात व्हिटॅमिनची कमतरता आहे हे जाणून घेणं फार अवघड असतं. कारण याची लक्षणं फार उशीरा दिसणं सुरू होतात. जर वेळीच याची माहिती मिळाली नाही तर याने गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या शरीरात होत असलेल्या छोट्या मोठ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
सर्वच व्हिटॅमिन्सप्रमाणे व्हिटॅमिन बी 12 सुद्धा शरीरासाठी फार आवश्यक मानलं जातं. हे व्हिटॅमिन्स रेड ब्लड सेल्स आणि डीएनएच्या निर्मितीसाठी गरजेचं असतं. सोबतच हे मेंदू आणि नर्व सेल्सच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात. मींट, अंडी आणि डेअरी प्रॉडक्ट्समध्ये व्हिटॅमिन बी 12 आढळून येतं. शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर हार्ट प्रॉब्लेम्स, इनफर्टिलिटी, थकवा, मसल्समध्ये कमजोरी आणि नर्वस सिस्टीमसंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. याची काही लक्षणेही दिसतात.
जिभेवर दिसतात काही लक्षणे
हेल्थ वेबसाइट वेबमेडनुसार, शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर लोकांना जिभेच्या अल्सरचा सामना करावा लागतो. अशात तुम्हाला जिभेवर आणि हिरड्यांवर अल्सर होऊ शकतो. जिभेवर येणारे अल्सरचे घाव सामान्यपणे ठीक होतात. पण जर तुम्हाला वेदनांपासून आणि जळजळीपासून वाचायचं असेल तर जास्त आंबट आणि जास्त तिखट असलेल्या पदार्थांचं सेवन बंद करा.
वेबमेडनुसार, जिभेवर घाव होणं हे व्हिटॅमिन बी 12 कमी असण्याचं लक्षण आहे. जिभेवर असलेल्या छोट्या छोट्या दान्यांना पॅपिला म्हटलं जातं. पण शरीरात व्हिटॅमिन बी 12 पूर्णपणे गायब झाले तर हे दाने पूर्णपणे गायब होतात आणि तुमची जीभ फार स्मूद होते. पण याची कारणे वेगळीही असू शकतात.
व्हिटॅमिन बी 12 कमी होण्याचे संकेत
शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाली तर इतरही काही संकेत दिसतात.
शरीरात एनर्जी न राहणे
मसल्स कमजोर होणं
धुसर दिसणे
सायकॉलॉजिकल समस्या जसे की, डिप्रेशन आणि कन्फ्यूजन
स्मरणशक्ती कमजोर होणं, गोष्टी समजण्यात वेळ लागणं
शरीरात झिणझिण्या येणं