चिंताजनक! लस घेतली म्हणून रिलॅक्स राहणं पडू शकतं महागात; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

By manali.bagul | Published: February 23, 2021 11:52 AM2021-02-23T11:52:41+5:302021-02-23T12:13:24+5:30

CoronaVirus news & latest Updates : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. 

Vaccination is not enough for dense cities like mumbai and delhi to control corona | चिंताजनक! लस घेतली म्हणून रिलॅक्स राहणं पडू शकतं महागात; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

चिंताजनक! लस घेतली म्हणून रिलॅक्स राहणं पडू शकतं महागात; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

Next

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून कठोर पाऊलं उचलली जाण्याची शक्यता आहे. कारण जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर लोक बिंधास्तपणे वापरत आहेत.  लस घेतली म्हणजे आपण कोरोनापासून बचावलो असं अजिबात नाही. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात  कोरोनाचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. 

ह्युमन बिहेविअर नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार दाट वस्ती आणि जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका टळणार नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. चायनीय युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंगच्या सहकार्याने साऊथॅम्प्टन विद्यापीठाने याबाबत अभ्यास केला आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी चीनमध्ये लसीकरण (Vaccination) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) याचा एकत्रित अभ्यास करण्यात आला. या संशोधनातून कमी, मध्यम व उच्च  लोकसंख्येच्या  शहरांवर कोरोनाच्या होणाऱ्या परिणामाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यातून समोर आलेल्या माहितीनुसार जोपर्यंत नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होत नाही तोपर्यंत मध्यम आणि दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये कोरोनाच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाबरोबरच सोशल डिस्टन्सिंग हेदेखील तितकंच महत्वाचं आहे.  कमी लोकसंख्या असलेल्या शहरांत जर लसीकरण योग्य पद्धतीनं राबवले  गेले तर सोशल डिस्टेंसिंगची आवश्यकता भासणार नाही.  

मध्यम आणि उच्च घनतेची लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोरोनाची संभाव्य लाट रोखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) निर्माण होण्यासाठी लसीकरण आणि सोशल डिस्टन्सिंग या दोन्ही गोष्टी एकत्रित राबवणं आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगचा (Social Distancing) पर्यायावर अल्प कालावधीसाठी कठोरपणे अंमलात आणला तर त्याचे परिणाम मध्यम ते दिर्घ मुदतीपर्यंत दिसून येतील, असे संशोधकांनी स्पष्ट केलं.

२०२११ च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या १.८४ कोटी आहे. याठिकाणी धारावीप्रमाणे अधिक दाटीवाटीच्या भागातही लोकांचं वास्तव्य आहे. तुलनेनं दिल्लीची लोकसंख्या ही 1.9 कोटी असून घनतेनुसार प्रतिचौरस किलोमीटरमध्ये 382 लोक राहतात. त्यामुळे या संशोधनानुसार लसीकरणानंतरही मुंबईवरील कोरोनाचं संकट इतक्यात दूर होणार नाही असं दिसून येत आहे.

दरम्यान राज्यात सोमवारी ५,२१० नवीन रुग्णांचे निदान आणि १८ काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.परिणामी, राज्यातील बाधितांची एकूण संख्या २१,०६,०९४ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ८०६ आहे.  राज्यात रविवारी ६,९७१ रुग्ण आणि ३५ बाधितांचा मृत्यू झाला हाेता. त्या तुलनेत साेमवारी नवीन बाधित तसेच मृत्यूंचे प्रमाण काहीसेे कमी झालेे. साेमवारी दिवसभरात ५,०३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

तर आतापर्यंत एकूण १९,९९,९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५७,९३,४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१३.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,०५४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १,८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २.४६ टक्के आहे. चिंताजनक! आधीपेक्षा अधिक वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; बचावासाठी CDC नं सांगितला प्रभावी उपाय
 

Web Title: Vaccination is not enough for dense cities like mumbai and delhi to control corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.