शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

उन्हाळ्यात कोथिंबीर उपयोगी भारी : झटपट सारे रोग दूर करी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 8:17 PM

तापलेले ऊन आणि त्यामुळे अंगाची होत असलेली लाही लाही दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी सर्वांत उपयोगी घटक म्हणजे कोथिंबीर. घरच्या घरी ताबडतोब आणि स्वस्तात होणारा उपाय म्ह्णून उन्हाळ्यात असणारे कोथिंबीरीचे महत्व घेणे गरजेचे आहे.

पुणे :  तापलेले ऊन आणि त्यामुळे अंगाची होत असलेली लाही लाही दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी सर्वांत उपयोगी घटक म्हणजे कोथिंबीर. घरच्या घरी ताबडतोब आणि स्वस्तात होणारा उपाय म्ह्णून उन्हाळ्यात असणारे कोथिंबीरीचे महत्व घेणे गरजेचे आहे. चला तर बघूया कोथिंबीरीचे फायदे आणि उपयोग :

त्वचेची आग थांबवते :

उन्हात फिरून आल्यावर अंगाची आग होत असेल किंवा जळजळ वाटत असेल तर कोथिंबिरीचा रसत्या जागेवर लावा. तेवढे शक्य नसेल तर कोथिंबिरीच्या काड्या आणि पानं हाताने चुरून हलक्या हाताने दाह होणाऱ्या जागी लावा. काही वेळात थंडावा जाणवायला सुरुवात होईल. 

मळमळ थांबवते :

पाणी कमी झाल्याने किंवा ऊन लागल्याने अनेकदा उन्हाळ्यात मळमळ होते. उलटीची भावना होते मात्र उलटी होत नसल्याने अस्वस्थ वाटते अशावेळी मळमळ थांबवण्यासाठी कोथिंबिरीची आठ ते दहा पानं चावून खाल्याने बरं वाटते. त्यानंतर त्यावर पाव चमचा साखर खाल्ल्याने तात्काळ फरक पडेल. 

मुरुमंही होतात दूर :

उन्हाळ्यात त्वचेवर येणाऱ्या घामामुळे आणि तेलामुळे धूळ बसून मुरुमाचे आणि फोडाचे प्रमाण वाढते. अशावेळी दोन चमचे कोथिंबीर रसात चिमूटभर हळद लावून तो पॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा. वाळल्यावर हलक्या हाताने चोळून चेहरा थंड पाण्याने धुवावा. 

पोटदुखीपासून आराम :

पोटदुखीमुळे होणाऱ्या वेदनाही कोथींबिरीमुळे दूर होतात. गॅस, अपचन झाले असल्यास आंबट नासलेल्या ताज्या टाकत कोथिंबिरीचा रस,हिंग आणि काळे मीठ टाकून घेतल्यास फरक पडतो. 

डोळ्यांचे आरोग्य सुधारते :

डोळ्यांच्या आरोग्यासाठी लागणारे व्हिटॅमिन ए कोशिंबिरीत मोठ्या प्रमाणात असल्याने नियमित सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. 

अशी साठवा कोथिंबीर :

एका हवाबंद स्टीलबंद डब्यात कोथिंबीर निवडून आणि मुख्य म्हणजे पूर्ण कोरडी करून ठेवा. अशी कोथिंबीर फ्रीजमध्ये १० ते १२ दिवस सुस्थितीत राहते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारBeauty Tipsब्यूटी टिप्स