तुमच्या लघवीतून अशाप्रकारची दुर्गंधी येते का? या आजारांचा असू शकतो संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 09:39 AM2022-12-29T09:39:50+5:302022-12-29T09:40:25+5:30

Urine odor : अनेकदा औषधांच्या सेवनामुळेही लघवीतून दुर्गंधी येण्याची समस्या होऊ शकते. पण अनेकदा लघवीतून अजब दुर्गंधी येणं एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

Urine odor : Know about unusual smell of urine | तुमच्या लघवीतून अशाप्रकारची दुर्गंधी येते का? या आजारांचा असू शकतो संकेत

तुमच्या लघवीतून अशाप्रकारची दुर्गंधी येते का? या आजारांचा असू शकतो संकेत

googlenewsNext

Urine odor : लघवीमधून खूप जास्त दुर्गंधी येणं एखाद्या गंभीर आजाराचा संकेत असू शकतो. सामान्यपणे जेव्हा तुमचं शरीर पूर्णपणे हाइड्रेटेड राहतं तेव्हा लघवीमधून कोणताही गंध येत नाही. मेयो क्लीनिकनुसार, जेव्हा तुमच्या लघवीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होण्यासोबत  अपशिष्ट पदार्थांचं प्रमाण जास्त होतं तेव्हा लघवीतून दुर्गंधी येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

अनेकदा औषधांच्या सेवनामुळेही लघवीतून दुर्गंधी येण्याची समस्या होऊ शकते. पण अनेकदा लघवीतून अजब दुर्गंधी येणं एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

डायबिटीस - डायबिटीस जास्त काळ त्रास देणारा आजार आहे. डायबिटीस झाल्यावर शरीर पुरेसं इन्सुलिन बनवू शकत नाही किंवा जेवढं इन्सुलिन तयार होतं शरीर त्याचा वापर करू शकत नाही. डायबिटीसची समस्या जेव्हा नियंत्रणात राहत नाही तेव्हा यामुळे लघवीतून डार्क, गोड, फ्रुटीसारखी दुर्गंधी येऊ लागते. ही दुर्गंधी लघवीमधील शुगरमुळे येऊ लागते. अशी दुर्गंधी येण्याचा अर्थ असा होतो की, तुमचं शरीर रक्तातून अतिरिक्त शुगर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

यूटीआय इन्फेक्शन - यूटीआय इन्फेक्शन एक बॅक्टेरिअल इन्फेक्शन आहे. जे पुरूषांच्या तुलनेत महिलांना जास्त होतं. पुरूषांच्या तुलनेत महिलांचा मुत्र मार्ग लहान असतो. ज्यामुळे बॅक्टेरिया सहजपणे यूरिन पाइपमध्ये जाऊ शकतात. यूटीआयमुळेही लघवीतून दुर्गंधी येते. यूटीआय झाल्यावर लघवीत बॅक्टेरिया असल्याने अमोनियासारखी दुर्गंधी येते.

प्रोस्टेटायटिस - प्रोस्टेटायटिस एक असा आजार आहे ज्यामुळे प्रोस्टेट ग्रंथीमध्ये सूज येते. यामुळे पुरूषांना लघवी पास करण्यात अडचण आणि वेदनेचा सामना करावा लागतो. या कारणानेही लघवीतून दुर्गंधी येते. ब्लॅडर इन्फेक्शनसारखीच प्रोस्टेटायटिस झाल्यावर लघवीतून सडलेल्या अंड्यासारखी दुर्गंधी येते.

लिव्हरसंबंधी समस्येमुळे - एका हेल्थ वेबसाइटनुसार,  लिव्हरमध्ये होणाऱ्या कोणत्याही समस्येमुळे लघवीतून एक वेगळाच गंध येतो. लिव्हरची समस्या झाल्यावर येणारा हा डार्क गंध लघवीमध्ये टॉक्सिन तयार झाल्याकडे इशारा करतो. लघवीमधून हा गंध तेव्हा येतो जेव्हा लिव्हर टॉक्सिन तोडण्यात सक्षम नसतं. या दरम्यान लघवीतून दुर्गंधी येण्यासोबत लघवीचा रंगही बदलतो. सामान्यपणे लघवीचा रंग हलका पिवळा असतो. पण लघवीसंबंधी समस्या झाल्यावर लघवीचा रंग भुरका किंवा ऑरेंज होतो.

Web Title: Urine odor : Know about unusual smell of urine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.