महिला असो वा पुरूष लघवी करताना वेदना, जळजळ होण्याची 'ही' असतात कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 10:22 AM2019-10-30T10:22:57+5:302019-10-30T10:24:29+5:30

लघवी करताना वेदना, जळजळ किंवा एखादी दुसरी समस्या जाणवणे सामान्य बाब आहे. पण अशी समस्या घेऊन लोक डॉक्टरकडे घेऊन जाण्यास टाळाटाळ करतात.

urine infection symptoms and reasons in female and men | महिला असो वा पुरूष लघवी करताना वेदना, जळजळ होण्याची 'ही' असतात कारणे!

महिला असो वा पुरूष लघवी करताना वेदना, जळजळ होण्याची 'ही' असतात कारणे!

googlenewsNext

(Image Credit : chandigarhayurvedcentre.com)

लघवी करताना वेदना, जळजळ किंवा एखादी दुसरी समस्या जाणवणे सामान्य बाब आहे. पण अशी समस्या घेऊन लोक डॉक्टरकडे घेऊन जाण्यास टाळाटाळ करतात. समस्या खूप जास्त वाढेपर्यंत याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की, या समस्येकडे दुर्लक्ष करून ते त्यांचंच आरोग्य खराब करून घेताहेत. चला जाणून घेऊ या समस्या होण्याची काही कारणे आणि लक्षणे....

का होते ही समस्या?

लघवीशी संबंधीत समस्या महिला आणि पुरूष दोघांमध्येही बघायला मिळते. पण महिलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळतात. मेडिकलच्या भाषेत या समस्येला डिस्यूरिया नावाने ओळखलं जातं. हे एकप्रकारचं इन्फेक्शन आहे. जे गुप्तांगामध्ये बॅक्टेरिया झाल्याने होतं. तज्ज्ञांनुसार, सामान्यपणे ही समस्या महिलांमध्ये २० ते ५० या वयात बघायला मिळते.

काय आहेत या इन्फेक्शनची लक्षणे

असं नाही की, ही समस्या केवळ महिलांना होते. पुरूषांमध्येही ही समस्या बघायला मिळते. असं मूत्र मार्गाच्या माध्यमातून बॅक्टेरिया यूरिनरी सिस्टीम आणि ब्लेडरपर्यंत पसरल्याने होतं. यादरम्यान प्रभावित व्यक्तीच्या लघवीतून दुर्गंधी येणे, पुन्हा-पुन्हा लघवी पास होणे, लघवीसोबत रक्त येणे, चेस्ट आणि बॅकमध्ये वेदना होणे किंवा ताप येणे अशीही लक्षणे दिसू शकतात.

पुरूषांमध्ये काय दिसतात लक्षणे?

जर डिस्यूरिया ही समस्या पुरूषांमध्ये झाली तर त्यांना प्रोस्टेटशी संबंधित समस्या असू शकते. यात स्वेलिंग होऊ शकते, इजॅक्यूलेशनवेळी वेदना होणे, लघवी करताना वेदना होणे आणि पुन्हा पुन्हा लघवी येणे अशी लक्षणे बघायला मिळतात.

हेही असू शकतं कारण

लघवीशी संबंधित समस्या होत असेल तर केवळ इन्फेक्शनच कारण असेल असं नाही तर स्टोनचा देखील संकेत असू शकतो. यूरिनरी सिस्टीममध्ये स्टोन झाल्यास पुन्हा पुन्हा लघवी येणे, लघवीचा रंग, भुरका, गुलाबी दिसणे, मूड चांगला नसणे, उलटी होणे, पाठीदुखी होणे, ताप येण्याचीही कारणे असू शकतात.


Web Title: urine infection symptoms and reasons in female and men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.