'या' ज्यूसचं कराल सेवन; तर दूर होइल ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 05:03 PM2019-06-10T17:03:53+5:302019-06-10T17:09:42+5:30

हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर मानलं जातं. याने शरीराचं कोणताही अवयव प्रभावित होऊ शकतो. खासकरुन उन्हाळ्यात ही समस्या अधिक धोकादायक ठरु शकते. त्याचबरोबर शरीरामध्ये वाढणारं कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही आरोग्यासाठी विशेषतः हृदयासाठी घातक ठरू शकतं.

Unsalted tomato juice reduce the risk of heart disease says research | 'या' ज्यूसचं कराल सेवन; तर दूर होइल ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचं टेन्शन

'या' ज्यूसचं कराल सेवन; तर दूर होइल ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचं टेन्शन

Next

हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर मानलं जातं. याने शरीराचं कोणताही अवयव प्रभावित होऊ शकतो. खासकरुन उन्हाळ्यात ही समस्या अधिक धोकादायक ठरु शकते. त्याचबरोबर शरीरामध्ये वाढणारं कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही आरोग्यासाठी विशेषतः हृदयासाठी घातक ठरू शकतं. पण यावर एक घरगुती असा, रामबाण उपाय सापडला आहे. हा उपाय आम्ही नाही तर एका संशोधनातून सांगण्यात आला आहे. 

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच तुम्ही जर हाय ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असाल तर टोमॅटोच्या मीठ न वापरता तयार केलेल्या रसाचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. टोमॅटोचा रस हृदयासंबंधीच्या आजारांनाही कमी करतो. 

'फूड सायन्स अॅन्ड न्यूट्रीशन'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनसाठी 184 पुरूष आणि 297 महिलांना जवळपास वर्षभर टोमॅटोचा मीठ नसलेला ज्यूस पिण्यास सांगण्यात आले. जपानमधील टोकियो मेडिकल अॅन्ड सायन्स डेंटल यूनिवर्सिटीच्या संशोधकांच्या सांगण्यानुसार, संशोधनाच्या शेवटी हाय ब्लडप्रेशरने पीडित असणाऱ्या 94 सहभागी लोकांचे ब्लड प्रेशर कमी झालयाचे दिसून आले. 

संशोधनमध्ये सांगण्यात आल्यानुसार, याव्यतिरिक्त हाय कोलेस्ट्रॉलने पीडित असणाऱ्या 125 सहभागी लोकांमध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉलच्या स्तरामध्ये 155.0 मिलीग्राम प्रति डेसीलीटरने कमी होऊन 149.9 मिलीग्राम प्रति डेसीलीटर एवढं झालं होतं. 

संशोधकांनी सांगितल्यानुसार, टोमॅटो किंवा यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाल्यामुळे हृदयाशी निगडीत आजारांवर परिणाम होतात. हे संशोधन पहिल्यांदाच करण्यात आलं असून संशोधन करण्यासाठी तब्बल एक वर्षाचा वेळ लागला. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना सहभागी करण्यात आलं होतं. 

टोमॅटोचा वापर भाजींमध्ये करण्यासोबत अनेकजण सलाद म्हणूनही केला जातो. टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे होतात हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. पण तुम्हाला टोमॅटो ज्यूसचे फायदे माहीत आहेत का? खरंतर अनेकांना टोमॅटो ज्यूसचे फायदे माहीत नसतात. त्यामुळे आम्ही टोमॅटो ज्यूसने होणारे फायदे तुम्हाला सांगणार आहोत. 

हिवाळा असो वा उन्हाळा प्रत्येक ऋतूमध्ये टोमॅटोचा वापर १२ महिने केला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे टोमॅटोचा असा काही सीझनही नसतो. चला जाणून घेऊ टोमॅटो ज्यूसच्या सेवनाने त्वचा आणि डिप्रेशनवर काय प्रभाव पडतो.

टोमॅटो आणि त्वचा

ब्रिटनच्या न्यूकॅसल यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका शोधात आढळलं की, टोमॅटोमध्ये एक असं तत्व आहे जे त्वचेच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे. टोमॅटोमध्ये आढळणारं लायकोपेन अॅंटी-एजींगची समस्या दूर करण्यास मदत करतं. हिवाळ्यात टोमॅटो ज्यूसचं अधिक सेवन केल्याने त्वचेला होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो. सूर्यकिरणांमुळे त्वचेला होणाऱ्या समस्याही टाळल्या जाऊ शकतात.  

किडनी स्टोन असताना टोमॅटो टाळावं?

जर तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल आणि नेहमी तरुण दिसायचं असेल तर रोज एक टोमॅटोचं सेवन करावं. जर टोमॅटोच्या ज्यूसचं सेवन केलं जर जास्त फायदा होऊ शकतो.


 
टोमॅटो आणि डिप्रेशन

टोमॅटोच्या सेवनामुळे डिप्रेशनच्या समस्येपासून बचाव केला जाऊ शकतो. हे बाब अनेक शोधांमधून समोर आली आहे. टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटॅमिन्स व्यक्तीला स्ट्रेस आणि डिप्रेशनच्या समस्येतून बाहेर काढतं. 

हृदयरोग दूर ठेवण्यासाठी फायदेशीर

डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, टोमॅटोने तणाव कमी करण्यास मदत मिळते. अभ्यासकांनी दावा केला आहे की, जे लोक आठवड्यातून दोन ते सहा टोमॅटो खातात, त्यांना टोमॅटो खात नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत ४६ टक्के कमी तणाव होतो. 

एका आठवड्यात किती टोमॅटो खावे?

टोमॅटोमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तत्व भरपूर प्रमाणात असतात, याने वेगवेगळ्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. टोमॅटोमुळे रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. 

टिप : वरील सर्व गोष्टी या संशोधनातून सिद्ध झाल्या असून आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

Web Title: Unsalted tomato juice reduce the risk of heart disease says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.