'सहेली'ची मासिक पाळीची 'पहेली' सोडवण्यासाठी हटके उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 18:25 IST2019-09-20T18:14:35+5:302019-09-20T18:25:09+5:30
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. हा कोणताही आजार नाही किंवा त्यामध्ये घाबरण्यासारखंही काही नाही. पण अद्यापही याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत.

'सहेली'ची मासिक पाळीची 'पहेली' सोडवण्यासाठी हटके उपक्रम
महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. हा कोणताही आजार नाही किंवा त्यामध्ये घाबरण्यासारखंही काही नाही. पण अद्यापही याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. अनेक गावा खेड्यांमध्ये तर मासिक पाळीसंदर्भात महिलांच्या मनात अनेक शंका असल्याचं पाहायला मिळतं. देशभरात अनेक सामाजिक संस्था, अनेक सेलिब्रिटी मासिक पाळीबाबत जनजागृती करत असल्याचे आपण पाहतो. परंतु, या गावातील महिलांना अद्याप मासिक पाळीबाबत अनेक गोष्टी माहितच नाहीत.
एवढचं नाही तर मासिक पाळीमध्ये वापरण्यात येणारे सॅनिटरी नॅपकिन्स म्हणजे नक्की काय असतं हे देखील त्यांना ठाऊक नाही. अशातच UNICEF आणि Stayfree एकत्र येऊन तरूण मुलींसाठी मासिक पाळीतील समस्या आणि त्या दिवसांत घ्यावयाची काळजी यासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी 'पहेली की सहेली' नावाचं एक कॉमिक तयार केलं आहे. ज्यामध्ये मासिक पाळी आणि त्यासंदर्भातील सर्व माहिती सांगण्यात आलेली आहे.