शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

ना गोळ्या, ना इंजेक्शन! डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आला नवा उपचार, रुग्णांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:13 IST

अमेरिकेतील संशोधकांनी या प्रकारच्या मधुमेहावर एक नवी उपचार पद्धती (Diabetes treatment) शोधली आहे. विशेष म्हणजे या उपचार पद्धतीमध्ये कसल्याही प्रकारच्या गोळ्या-औषधे किंवा इंजेक्शनची गरज भासत नाही.

मधुमेह (Diabetes) या दुर्धर आजाराची लागण झाली, की माणसाला आयुष्यभरासाठी गोळ्या आणि इंजेक्शनची गरज भासते. कारण या आजारावर अद्याप रामबाण इलाज (Diabetes cure) उपलब्ध नाही. अशात टाईप-2 डायबेटिस (Type 2 diabetes) असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील संशोधकांनी या प्रकारच्या मधुमेहावर एक नवी उपचार पद्धती (Diabetes treatment) शोधली आहे. विशेष म्हणजे या उपचार पद्धतीमध्ये कसल्याही प्रकारच्या गोळ्या-औषधे किंवा इंजेक्शनची गरज भासत नाही.

अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचारअमेरिकेतील जीई रिसर्चच्या (GE research diabetes) एका पथकाने ही नवी उपचार पद्धती शोधली आहे. या पथकामध्ये येल स्कूल ऑफ मेडिसीन आणि फेंस्टीन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधकांचा समावेश आहे. डायबेटिक व्यक्तीच्या लिव्हरवर अल्ट्रासाउंड किरणांचा (Ultrasound rays) मारा करून, शरीरातील इन्शुलिन (Insulin) आणि ग्लुकोजचा स्तर कमी करणं, अशी ही एकूण प्रक्रिया आहे. नेचर (Nature magazine) या विज्ञानविषयक मॅगझिनमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या उपचार पद्धतीला पेरिफेरल फोकस्ड अल्ट्रासाउंड स्टिम्युलेशन (pFUS) असं नाव देण्यात आले आहे.

कशी आहे प्रक्रियासंशोधकांनी सांगितलं, की यकृतामध्ये पोर्टा हेपॅटिस (Porta Hepatis) नावाच्या भागात पाठीपासून येणाऱ्या मज्जातंतूंचं जाळं असतं. हे मज्जातंतूच मेंदूला शरीरातील ग्लुकोज आणि इतर पोषकतत्त्वं किती प्रमाणात आहेत हे सांगत असतात. हे मज्जातंतू आकाराने अगदीच लहान असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड असतं. मात्र, अल्ट्रासाउंड किरणांच्या मदतीने (Diabetes treatment with ultrasound) या मज्जातंतूंना संदेश पोहोचवणं सोपं होतं. या प्रयोगावेळी आम्ही यकृताच्या (Liver) पोर्टा हेपॅटिस भागात pFUS अल्ट्रासाउंड किरणं सोडली. या माध्यमातून हाय ब्लड शुगर पुन्हा नॉर्मल करण्यात आम्हाला यश मिळालं.

अद्याप मानवी चाचणी बाकी

नेचर मॅगझिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अद्याप केवळ उंदीर आणि डुक्कर या प्राण्यांवर या उपचार पद्धतीची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. केवळ तीन मिनिटं अल्ट्रासाउंडचा (Ultrasound for diabetes treatment) मारा करून संशोधकांना या प्राण्यांमधील साखरेचा स्तर पूर्णपणे सामान्य करण्यात यश मिळालं. त्यामुळे आता याची माणसांवर चाचणी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

तीन मिनिटांत शुगर होणार नॉर्मलया उपचार पद्धतीची मानवी चाचणी यशस्वी ठरली तर तो एक मैलाचा दगड ठरणार आहे. भविष्यात आपण अल्ट्रासाउंडचा मारा करणारी छोटी उपकरणं तयार करू शकतो, जी रुग्णांना आपल्या घरी वापरता येतील. या उपकरणांच्या मदतीने दररोज काही मिनिटांमध्येच लोक आपली ब्लड शुगर नियंत्रणात आणू शकतील. यामुळे गोळ्या-औषधं किंवा इन्शुलिनच्या इंजेक्शनचा त्रास इतिहासजमा होईल.

डायबेटिसवरील ही उपचार पद्धती अंमलात आल्यास जगभरातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. हे टेक्निक डायबेटिसच्या उपचारांमध्ये नक्कीच गेमचेंजर ठरणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह