UK doctor ran 22 miles while wearing a face mask to prove they don't affect oxygen levels | मास्क घालून ICU मधला डॉक्टर ३५ किमी धावला; 'ऑक्सिजन लेव्हल'चं काय झालं बघा

मास्क घालून ICU मधला डॉक्टर ३५ किमी धावला; 'ऑक्सिजन लेव्हल'चं काय झालं बघा

(Image Credit : kcci.com)

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांना सतत मास्कचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. पण मास्क न घालण्यासाठी वेगवेगळी कारणे देणारेही अनेक लोक आहेत. खासकरून एक्सरसाइज करताना मास्क न वापरण्याची कित्येक कारण लोक सांगतात. जसे की, एक्सरसाइज करताना मास्क लावल्याने श्वास घेता येत नाही. ते कम्फर्टेबल नाहीत इत्यादी कारणे. 

इतकंच नाही तर काही लोकांना असाही समज करून घेतलाय की, एक्सरसाइज करताना मास्क वापरल्याने त्यांची ऑक्सजन लेव्हल कमी होते. मात्र, यूकेतील ICU मधील डॉक्टर Tom Lawton यांनी अशा लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी स्वत: एक प्रयोग केला. त्यांनी लोकांचा हा गैरसमज एका मॅरेथॉनमध्ये धावून दूर केला.

CTV News ला डॉक्टर Tom यांनी सांगितले की, 'लोकांना हे समजावून सांगण्यासाठी मला काय करता येईल याचा मी विचारच करत होतो. त्या लोकांना कसं समजावू ज्यांना मास्क घालायला भीती वाटते. मला शरीर क्रिया रचना चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे लोकांमध्ये असलेला हा समज चुकीचा असल्याची मला कल्पना होती'. अशात त्यांनी मास्क लावून ३५ किलोमीटर धावण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्यांची ऑक्सीजन लेव्हल चेक ट्रॅक करता येईल. 

Tom यांनी धावताना पल्स ऑक्सीमीटरने त्यांच्या ऑक्सीजन लेव्हलवर लक्ष ठेवलं. तसेच मास्क त्यांच्या श्वासोच्छवासावर परिणाम करतं का याचाही डेटा ट्रॅक केला. त्यांनी धावताना दर अर्ध्या तासाने त्यांची ऑक्सीजन लेव्हल चेक केली. धावताना प्रत्येकवेळी 98 ते 99 असं रीडींग सतत होतं. जी नॉर्मल ऑक्सीजन लेव्हल असते. तसेच धावताना त्यांना श्वासासंबंधी काहीही समस्या झाली नाही.

ते म्हणाले की, 'ही फारच वाईट बाब आहे की, लोक मास्कचा वापर करत नाहीत. पण ही एकच गोष्ट अशी आहे जी आपल्याला मदत करू शकते'. तुम्हाला जर धावताना वेगळ्या मास्कचा वापर करायचा असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. 

हे पण वाचा :

coronavirus: भारतात कितपत प्रभावी ठरतेय प्लाझ्मा थेरेपी? डॉक्टर म्हणतात...

खुशखबर! कोरोनाच्या लसीबाबत 'या' देशातील कंपनीची दिलासादायक माहिती; तज्ज्ञ म्हणाले की...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: UK doctor ran 22 miles while wearing a face mask to prove they don't affect oxygen levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.