दवाखान्यात जाणं टाळायचं असेल; तर निरोगी राहण्यास 'हे' घरगुती पदार्थ ठरतील रामबाण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 20:13 IST2020-07-09T20:12:28+5:302020-07-09T20:13:24+5:30
रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास तुम्ही संक्रमणापासून स्वतःचा बचाव करू शकता. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांपासून सांगणार आहोत.

दवाखान्यात जाणं टाळायचं असेल; तर निरोगी राहण्यास 'हे' घरगुती पदार्थ ठरतील रामबाण उपाय
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतात कोरोनाचा मृत्यूदर कमी असला तरी कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पावसाळ्याचं वातावरण सुरू झाल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं महत्वाचं आहे. कोरोना काळात विषाणू आणि किटाणूंच्या संक्रमणापासून वाचायचं असेल तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास तुम्ही संक्रमणापासून स्वतःचा बचाव करू शकता. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांपासून सांगणार आहोत.
आळशी
आळशीच्या लहान बीयांमुळे तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता. शरीरातील रक्तप्रवाह चांगला होण्यापासून कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आळशीच्या बीया फायदेशीर ठरतात. आळशीमध्ये एलर्जिक सीलियम, ओमेगा-3 फॅटी एसिड्स असतात. एक चमचा आळशीत गरम दूधात घालून प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. याशिवाय दह्यासोबत आळशीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.
तुळस
शरीरातील रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते. तुळशीमध्ये असलेले इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
हळद
हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते. म्हणून कोरोनासोबत जगत असताना तुम्हाला आजापासून लांब राहायचं असेल तर नेहमी सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात हळद मिसळून या पाण्याचे सेवन करा.
आलं
सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे. अजीर्ण झाल्यास आल्याचे रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. आले तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात. लाळ पाझरू लागते. आल्याचे सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही. पोटदुखी व मळमळ थांबण्यास मदत होते. आलं घातलेला चहा प्यायल्यास सर्दी, डोकेदुखीची समस्या दूर होते.
मोठा दिलासा! भारतासह अमेरिकेतही कोरोनाशी लढण्यासाठी आयुर्वेदिक औषधांच्या चाचणीला सुरूवात
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा