कोरोनाकाळात हरवलेल्या मानसिक स्वास्थ्यासाठी तज्ज्ञांनी सुचविल्या काही टिप्स, नक्की फॉलो करा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 06:19 PM2022-01-04T18:19:51+5:302022-01-04T18:23:42+5:30

लोकांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ हरवत आहे. नैराश्य, फोबिया, बधिरता असे अनेक मानसिक, शारीरिक आजार वाढत आहेत. लोकांमध्ये एक प्रकारची नकारात्मक मरगळ जाणवत आहे. याचा परिणाम लोकांना सहजपणे या विषाणूची लागण होण्यात होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत.

tips by mental health experts during corona period stress and psychological problems or issues | कोरोनाकाळात हरवलेल्या मानसिक स्वास्थ्यासाठी तज्ज्ञांनी सुचविल्या काही टिप्स, नक्की फॉलो करा

कोरोनाकाळात हरवलेल्या मानसिक स्वास्थ्यासाठी तज्ज्ञांनी सुचविल्या काही टिप्स, नक्की फॉलो करा

googlenewsNext

गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ सगळं जग कोरोना विषाणूच्या महाभयंकर साथीशी (Coronavirus Pandemic) लढत आहे. सगळ्या जगात (World) या विषाणूने (Virus) हाहाकार माजवला आहे. लाखो लोकांचा मृत्यू झाला असून, कोट्यवधी लोकांना याची लागण झाली आहे. आतापर्यंत याच्या दोन लाटा येऊन गेल्या असून सध्या तिसरी लाट सर्वत्र थैमान घालत आहे. याचा दुसरा परिणाम म्हणजे लोकांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ हरवत आहे. नैराश्य, फोबिया, बधिरता असे अनेक मानसिक, शारीरिक आजार वाढत आहेत. लोकांमध्ये एक प्रकारची नकारात्मक मरगळ जाणवत आहे. याचा परिणाम लोकांना सहजपणे या विषाणूची लागण होण्यात होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत.

या विषाणूचे नवनवे प्रकार लसीला दाद देतीलच याची खात्री नसल्यानं सगळ्या जगासमोर या विषाणूचं आव्हान कायम आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेला कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन हा नवा प्रकार तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळं सतत चिंतेचं सावट लोकांच्या डोक्यावर घोंगावत आहे. त्यामुळं लोकांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. त्याचबरोबर सुरक्षित राहण्यासाठी सदैव काळजी घ्यावी लागत असल्यानं अनेक निर्बंध पाळावे लागत आहेत, त्याचाही मानसिक ताण लोकांना जाणवत आहे. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक स्वास्थावरही होत आहे.

अनेक लोक आता निर्बंध (Protocol) पाळण्यास तयार नाहीत. बाधितांची संख्या वाढण्यास हातभार लागत आहे. नवीन वर्ष साजरे करताना निर्बंधांचे पालन न करणाऱ्या लोकांचे असंख्य व्हिडिओज न्यूज पोर्टलवर दाखवले गेले. लोक आता कोणताही निर्बध पाळण्याच्या मानसिकतेत नसल्याचे यातून स्पष्ट होते. लोक इतके बेफिकीर होण्यामागे या साथीमुळे आलेला थकवा, ताण हे मुख्य कारण आहे. याचा परिणाम संख्या वाढीवर होईल,अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणेवर (Health System) ताण येण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्यासह तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वैद्यकीय पायाभूत सुविधांचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला तेव्हा मास्किंग आणि इतर कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिल्यानं बाधितांच्या संख्येत घट झाली. तसंच लसीकरणाचं प्रमाणही वाढल्यानं दुसरी लाट काही महिन्यांत कमी झाली. मात्र ओमिक्रॉन प्रकारामुळे पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं लोकांना कोविड सुरक्षा नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे.

पीडमॉन्टच्या एका अहवालात संसर्गजन्य रोग चिकित्सक ग्वेनेथ फ्रान्सिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, साथीच्या थकव्याची काही लक्षणं सांगितली आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत.

- मास्क आणि सामाजिक अंतर यांचं पालन करण्यात घट

- मास्क न घातलेल्या एखाद्या व्यक्तीच्या जवळून गेल्यास चिंता वाटणे

- पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा जाणवणे

- जगण्याला काहीही अर्थ नाही, अशी भावना निर्माण होणे

-जवळच्या लोकांवर राग काढला जात आहे.

- उदासीनता, एकटेपणा जाणवणे

याबाबत काही उपाय तज्ञांनी सुचवले आहेत. युसी हेल्थच्या (UC Health) अहवालानुसार, अशा साथीच्या काळात येणारा मानसिक थकवा (Fatigue) दूर करण्यासाठी सर्वात महत्वाचा मार्ग आहे तो म्हणजे टीव्ही, मोबाइल यावर घालवला जाणारा वेळ कमी करणे. तर साथीच्या आजाराच्या परिणामांचे अभ्यासक मानसशास्त्रज्ञ जस्टिन रॉस यांच्या मते सोशल मीडियावर डूमस्क्रॉलिंग म्हणजेच जाणीवपूर्वक नकारात्मक बातम्या, माहिती वाचल्याची सवय भीती, अनिश्चितता, चिंता आणि थकवा वाढवते. हे टाळण्यासाठी व्यायाम आणि ध्यानधारणेला वाव देणं महत्त्वाचं आहे. यामुळं मानसिक आरोग्यामध्ये लक्षणीय फरक पडेल,असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

ग्वेनेथ फ्रान्सिस यांच्या मते, तुम्हाला एकटेपणा वाटत असेल तर, कोरोना सुरक्षेसाठी नियमांचे पालन करणारे कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांच्या गटासह एक कोविड बबल तयार करू शकता. ज्याला सोशल पॉड म्हणूनही ओळखले जाते. ही अशी क्वारंटीम हा घराबाहेरील लोकांशी संवाद साधण्याचा एक सुरक्षित मार्ग असू शकतो. तुम्ही तुमच्या बबलमधील लोकांबरोबर कार्यक्रमांचं आयोजन करू शकता. आजी-आजोबा आणि मित्र-मैत्रीणीचा गट यांचा तुमची बबलमध्ये समावेश असू शकतो. हे सर्वजण मास्क घालत असतील. त्यामुळे घरातील लहान मुलांनादेखील इतरांशी संवाद साधता येईल.

सामाजिक संपर्क कमी झाल्यामुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. यावर उपाय म्हणजे मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य व्यक्तींची मदत घेणं. ही अत्यंत साधी आणि सहज गोष्ट आहे,असं तज्ञ अॅना याप यांनी एका लेखात स्पष्ट केलं आहे. भावनिक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक, सर्वच पातळ्यांवर तुम्ही थकलेले आहात. आयुष्याला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी कमी झाल्या आहेत. मात्र या परिस्थितीवर मात करायची असेल तर, मनात आशावाद कायम ठेवा. परिस्थिती नक्कीच सुधारेल, असं डॉ. कार्ल लॅम्बर्ट यांनी म्हटलं आहे.

तर डॉ. याप यांच्या मते हा सगळा ताण, थकवा तलावात पोहणाऱ्या एखाद्या कुत्र्यासारखा आहे. आपण कुठे जात आहोत, हे त्याला कळत नसते. तशी अवस्था माणसाची झाली आहे. माणूस म्हणून, आपल्याला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा आपण त्यासाठी प्रयत्न करत असतो, मात्र ती गोष्ट कधी मिळेल हे माहित नसेल तर त्या दिशेने जाणं कठीण होतं. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मानसिक सामर्थ्य टिकवणे महत्त्वाचे आहे. याकरता कपड्यांमध्ये बदल करणे किंवा बेडरूममधून लिव्हिंग रूममध्ये रहायला जाणे असे काही बदल करणे उपयुक्त ठरू शकते.

तेव्हा कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराशी सामना करण्यासाठी मानसिक आरोग्य टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तज्ञांनी सुचवलेले काही उपाय नक्कीच उपयुक्त ठरतील

Web Title: tips by mental health experts during corona period stress and psychological problems or issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.