शहरं
Join us  
Trending Stories
1
सोशल मीडियात अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी...: खासदार सुनील तटकरेंचा गंभीर आरोप
2
मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 
3
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ५३ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश
4
घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 
5
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारत-अमेरिका सामना रद्द झाल्यास पाकिस्तानची नौका बुडणार; पावसाने वाढवली शेजाऱ्यांची धाकधुक 
6
इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य
7
उद्धव ठाकरेंनंतर नायडूंनी 'करून दाखवलं'; जे लालू यादव, मुलायम यांनाही जमलं नाही
8
अमित शाह व्यासपीठावरच संतापले? माजी राज्यपालांसोबतचे संभाषण व्हायरल; नेमकं काय घडलं
9
'पहला नशा'मध्ये पूजा बेदीचा स्कर्ट उडाला अन् ते पाहून स्पॉट बॉय...; फराह खानने सांगितला किस्सा
10
बापरे! नखांवरून समजतो मोठ्या आजाराचा धोका; 'या' संकेतांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
11
'पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही', राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात...
12
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं महायुतीकडे मागितल्या 'या' २० जागा?
13
30 चा पंच...! 'चलाख' चीनला 'सणसणीत' उत्तर, शपथ घेताच मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
भारत Super 8 मध्ये कोणाला भिडणार? तगड्या संघांचे आव्हान असणार! पण, हे कसं ठरणार?
15
नितीश कुमारांप्रमाणेच चंद्राबाबू पाया पडण्यासाठी झुकले, मात्र पीएम मोदींनी थेट मिठी मारली....
16
अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचं निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट
17
'मुस्लिमांनी मदरशा, हिजाब आणि सानिया मिर्झाचा स्कर्ट...', नसिरुद्दीन शाह यांनी मांडलं परखड मत
18
Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लूचं नवं संकट; 4 वर्षांचा मुलगा ICU मध्ये दाखल, WHO ने केलं अलर्ट
19
Life Lesson: तुम्हाला त्रास देणाऱ्या, छळणाऱ्या, लोकांकडे किडा समजून दुर्लक्ष करा!- सद्गुरू
20
डोंबिवली MIDC मधून शिंदे सेनेचे लोक...; संजय राऊत यांचा हल्लाबोल

तुमच्या हृदयाचे आरोग्य अवलंबून आहे तुमच्या 'या' सवयींवर, वेळीच योग्य ते बदल करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 2:59 PM

आपल्या हृदयाची(Heart) योग्य ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. यामुळे वेळीच हृदयाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकता.

जगभरात हृदयरोग असणाऱ्या लोकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वर्ल्ड हार्ट फेडरेशन नुसार ५५ वर्षाच्या आधी जर तुम्हाला हृदयाशी संबधित आजार असतील आणि या वयाच्या आतच तुम्हाला हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअरच्या समस्येचा समाना करावा लागत असेल तर तुमच्या कुटुंबातही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. याचा अर्थ असा की तुमच्या घरात ५५ वर्षाच्या आतील व्यक्ती जर हृदयाच्या समस्येने ग्रासित असेल तर तुम्हालाही हृदयाशी संबधित रोगांचा सामना करावा लागू शकतो.

तसेच  या कोरोना महामारीच्या काळातही हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या लोकांना अधिक त्रास होतो आहे. अशा व्यक्तींनी कोरोनाकाळात घराबाहेर पडूच नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे याकाळात आपल्या हृदयाची(Heart) योग्य ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. यामुळे वेळीच हृदयाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकता.

पोषक आहारप्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा वापर, जंक फूडचा वापर वाढत असल्याने आपली जीवनशैली (Lifestyle) अनियमित बनत चालली आहे. ताज्या भाज्या, घरगुती अन्न आपल्या हृदय आणि आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जाणार्‍या भाज्या, धान्य, प्रथिनेयुक्त खाद्य पदार्थ यांचा आहारात समवेश करावा. खाद्य तेलाचा वापर कमी प्रमाणात करावा. आपल्या आहारात दूध आणि दुग्ध उत्पादनांचा देखील प्रमाणात समावेश करावा. सकस अन्न पदार्थ पोटात गेल्याने शरीर तंदुरुस्त होतेच, पण हृदय (Heart) निरोगी राखण्यासदेखील मदत होते.

ताण-तणाव नियोजनया कोरोना काळात प्रत्येक जण तणावपूर्ण आयुष्य (lifestyle) जगत आहे. एकीकडे संसर्गाची भीती आहे, तर दुसरीकडे, नोकरी गमावणे, आर्थिक अडचणी अशा अनेक कारणांमुळे तणाव वाढत आहे. या काळात संसर्गापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. परंतु, या काळात जर आपल्याला तणाव येत असल्यास त्याचे वेळीच नियोजन करावे. मनाला आनंद वाटेल अशा गोष्टी कराव्यात. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह कॉलवर, व्हिडिओ चॅटवर गप्पा माराव्या. आपल्याला काय वाटते, याबद्दल त्यांना सांगावे, जेणेकरुन या तणावातून मुक्त होण्यास तुम्हाला मदत होईल. वाढत्या तणावाचा मन आणि शरीरासह हृदयावरदेखील गंभीर परिणाम होत असतो.

शारीरिक व्यायामदिवसातून किमान ४५ मिनिटे व्यायाम करणे किंवा चालणे शरीर सुधृढ ठेवण्यास मदत फायदेशीर ठरते. सध्या कोरोनामुळे जरी घराबाहेर जाता येत नसले, तरी घरातच किमान १० हजार पावले चालून जितका व्यायाम होती, तितकी शारीरिक कसरत करावी. योग-प्राणायाम या सारख्या व्यायामांमुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी संतुलित राहते. परिणामी तंदुरस्त शरीरासह हृदयदेखील (Heart) निरोगी बनते.

पुरेशी झोपहृदय निरोगी ठेण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. झोपेचा अभाव हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढवतो. आजकाल वर्क फ्रोम होम सुरू असल्याने बरेच लोक दुपारी झोप काढतात आणि रात्री उशिरापर्यंत जागरण करतात. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि वेगवेगळ्या तक्रारी उद्भवायला लागतात. रात्री कमीतकमी ७-८ तास झोप मिळाल्यास, दिवसा शरीर-मन तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत होते. याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो.

नियमित तपासणीवरील सर्व गोष्टींचे अनुसरण करणे महत्त्वाचे आहेच. परंतु, याबरोबर हृदयाची संपूर्ण निरोगीता सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी करणे देखील आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार हृदयाची नियमित तपासणी करणे अधिक महत्त्वाचे असते. म्हणूनच, दर सहा महिन्यांनी तपासणी करावी. हृदयासंबंधित कुठलीही तक्रार किंवा समस्या वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स