शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पावसाळ्यात कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 11:22 AM

धुतलेल्या कपड्यांची दुर्गंधी येणे ही समस्या फारच त्रासदायक ठरते. यामुळे तुमच्या सोबतच इतरांनाही त्रास होतो. पण हा त्रास काही घरगुती उपायांनी कमी केला जाऊ शकतो. 

(Image Credit: MensXP.com)

पावसाळा आला की, वेगवेगळ्या समस्याही आपसूक येऊ लागतात. त्यात धुतलेल्या कपड्यांची दुर्गंधी येणे ही समस्या फारच त्रासदायक ठरते. यामुळे तुमच्या सोबतच इतरांनाही त्रास होतो. पण हा त्रास काही घरगुती उपायांनी कमी केला जाऊ शकतो. 

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी का येते?

पावसाळा सुरु होताच कपड्यांना एक वेगळाच दमट वास यायला लागतो. अनेकदा घाम आणि पावसाचं पाणी एकत्र झाल्यानेही हा वास येतो. त्यामुळे अनेकांना चारचौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. अशात यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. पण तरीही ही दुर्गंधी दूर होत नाही. त्यामुळे काही घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

कपड्या धुतल्यानंतर चांगले पिळायला हवे

पावसाळ्या उन कमी पडतं त्यामुळे सुकायला घातलेल्या कपड्यांचा वास यायला लागतो. त्यामुळे कपडे धुतल्यानंतर त्यातील पाणी चांगल्याप्रकारे निघायला हवं. कपड्यांमधील पाणी पूर्णपणे निघालं ते फॅनच्या हवेत सुकायला ठेवा.

इस्त्री करा

धुतलेल्या कपड्यांमध्ये आताही वास येत असेल तर ते कपडे वापरण्याआधी एकदा इस्त्री करा. किंवा रात्रीच त्या कपड्यांना इस्त्री करुन फॅनच्या हवेखाली ठेवा. इस्त्री केल्यामुळे कपड्यांचा वास पूर्णपणे निघून जातो.

कपडे उघड्यावर ठेवा

अनेकडा पावसाळ्यात घरात एकप्रकारचं दमट वातावरण निर्माण होतं. त्यामुळे कपड्यांनाही एक वेगळाच वास यायला लागतो. अशावेळी धुतलेले कपडे कपाटात ठेवण्यापेक्षा मोकळ्या हवेत ठेवा.

परफ्युम-डिओड्रन्ट

पावसाळ्यात घामाच्या दुर्गंधी दूर करण्यासाठी डिओचा वापर करा. बाहेर जाताना बॅगमध्ये डिओ सोबत ठेवा. कपड्यांचा अधिकच वास येत असेल तर डिओचा वापर करु शकता.

एक्स्ट्रा कपडे ठेवा

पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपड्यांची एक जोडी सोबत ठेवा. कारण पावसात भिजल्यानंतर कितीही डिओचा वापर केला तरी कपड्यांना वास येतोच. त्यामुळे सोबत कपडे सोबत ठेवल्यास ते तुम्ही बदलू शकता.  

या गोष्टींचीही घ्या काळजी

1) पावसाळ्यात उन कमी पडत असल्याने कपडे कमी धुवायला काढले तर चांगलं. 2) कपडे सुकवण्यासाठी न्यूज पेपरचा वापर करा. हॅंगरला लटकवलेल्या कपड्यांखाली न्यूज पेपर ठेवा. पेपर पाणी शोषूण घेतो. 3) कपडे धुतल्यानंतर काही वेळ पाणी झरण्यासाठी तसेच ठेवा. त्यानंतर ते मोकळ्या जागेत सुकायला ठेवा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशलmonsoon 2018मान्सून 2018Rainपाऊस