वेळेवर जेवण न घेतल्याने शरीरातील अंतर्गत क्रिेयेवर विपरित परिणाम होतो.
निरोगी शरीरासाठी वेळेवर जेवण
/>आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळेवर जेवण करणे हे खूप गरजेचे आहे. परंतु, आजच्या धावपळीच्या युगात अनेकांचे वेळेवर जेवणच होत नाही. त्यामुळे त्याचा शरीरातील अंतर्गत क्रिेयेवर विपरित परिणाम होतो. रात्री उशिरा जेवण करणे हे शरीरासाठी खूपच अपायकारक असल्याचे एका सर्व्हेमधून समोर आले आहे. ब्रिटनमधील संशोधनकांनी हा सर्व्हे केला. यामध्ये रात्री ७ ते ९ ही वेळ जेवणासाठी उत्तम असल्याचे सांगितले. संशोधकांनी उच्च रक्तदाबाने प्रभावित ७०० वयस्करांवर याबाबतचे प्रयोग केले. याकरिता सर्वांना वेगवेगळ्या वेळी जेवण व न्याहरी देण्यात आली. अवेळी जेवण करण्याचा काय परिणाम होतो, हा यामागील उद्देश होता. रात्री उशिरा जेवल्याने विविध व्याधींना निमंत्रण व आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवत असल्याचे यामधून समोर आले. वेळेवर जेवण नसल्याने मिळेल ते खाण्याकडे कल असतो. त्यामुळे शरीराला पोषक नसलेला आहारही आपण घेतो. तो आहार घेतल्याने त्याचा शरीराला फायदा होण्यापेक्षा उलट नुकसान होते. नियमित व योग्यवेळी आहार घेणारे उत्तम जीवन जगत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. रात्रीच्या जेवणात वेळ न पाळणाºयांमध्ये हृदयविकाराचाही धोका अधिक असतो.