२० हजार पट जास्त खतरनाक होऊन पसरला हा कीटक जो बेडमध्ये लपून बसतो, वैज्ञानिक चिंतेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:50 IST2025-01-02T16:49:18+5:302025-01-02T16:50:34+5:30
New Strain of bed bugs:आता त्यांच्यापासून बचाव करणं आणि त्यांना मारणं अवघड झालं आहे. आता ते २० हजार पटीनं अधिक खतरनाक झाले आहेत.

२० हजार पट जास्त खतरनाक होऊन पसरला हा कीटक जो बेडमध्ये लपून बसतो, वैज्ञानिक चिंतेत!
New Strain of bed bugs: निसर्ग असो, व्यक्ती असो वा समाज असो यात परिवर्तन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक गोष्टी वेळेनुसार बदलत असते. मनुष्य, प्राणी, कीटक आणि झाडी सगळ्यांमध्ये परिवर्तन होत असतं. जे कुणीही रोखू शकत नाही. परिवर्तनानंतर काही गोष्टी चांगल्या होतात तर काही नुकसानकारक. अशात वैज्ञानिकांनी एका छोट्याशा जीवाबाबत इशारा दिला आहे. त्यांच्यानुसार, हा जीव आता आधीपेक्षा अधिक खतरनाक झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा जीव आपल्या झोपण्याच्या बेडवर आणि चादरींधमध्ये राहतो. या जीवाला मारणं, नष्ट करणं हे आधी सोपं होतं. पण आता त्यांच्यापासून बचाव करणं आणि त्यांना मारणं अवघड झालं आहे. आता ते २० हजार पटीनं अधिक खतरनाक झाले आहेत.
डेली स्टार न्यूजच्या एका वृत्तानुसार, वैज्ञानिकांनी एका खतरनाक खटमलाबाबत माहिती दिली आहे. जपानच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या खटमलात ७२९ वेळा म्यूटेशन झालं आहे, ज्यामुळे ते आता कीटकनाशकानं मरणार नाहीत. त्यांचं कवचही आता जास्त जाड झालं आहे. ज्यामुळे सामान्य कीटकनाशक किंवा स्प्रे चा त्यांच्यावर काहीच प्रभाव पडणार नाही.
ब्रिटन आणि इतर देशात लोक चिंतेत
हिरोशिमा यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एक सुपर बग शोधला आहे. ज्यात पायरेथरॉइड्स (कीटनाशक) प्रति २० हजार पटीनं प्रतिकार करण्याची क्षमता आहे. हे कीटकनाशक जगात वापरलं जाणारं सगळ्यात कॉमन कीटकनाशक आहे. वैज्ञानिकांनी सांगितलं की, या बगनं केवळ जपान नाही तर ब्रिटन आणि इतरही देशांमधील कीटकांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळेल.
एकाच वेळी ५ अंडी
खटमलांमुळे मनुष्यांना थेटपणे कोणताही आजार पसरत नाही. पण त्यांच्या चावण्यामुळे त्वचेवर रॅशेज, खाज किंवा सामान्य इन्फेक्शन होऊ शकतं. खटमल घरातून बाहेर काढणं फारच अवघड काम असतं. कारण मादी खटमल एकावेळी ५ अंडी देते. तर पूर्ण जीवनात साधारण ५०० ते ७०० अंडी देते. नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये आढळून आलं की, खटमल आता आधीपेक्षा जास्त खतरनाक झाले आहेत. तसेच त्यांच्याविरोधात जुने कीटकनाशक प्रभावी ठरणार नाहीत. तर काही एक्सपर्टचं मत आहे की, खटमल मारण्यासाठी घराचं तापमान वाढवलं जाऊ शकतं. पण यामुळे मनुष्यांना समस्या होऊ शकते.