वजन कमी करणं हे प्रत्येकासाठी एक चॅलेंज बनलं आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. बीझी शेड्यूलमध्ये वजन कमी करणं अत्यंत अवघड आहे. पण घाबरू नका, आज आम्ही तुम्हाला वजन की करण्यासाठी काही आवश्यक टिप्स सांगणार आहोत. ज्यासाठी तुम्हाला कुठेही दूर जाण्याची गरज नाही. एवच नाही तर तुम्हाला फारसा वेळही खर्च करण्याची गरज नाही. घरातील स्वयंपाक घरातच काही असे पदार्थ असतात. जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. 

वेट लॉस एक चॅलेंज 

अनेकदा लोक आपल्या वाढलेल्या वजनामुळे चिंतेत असतात. खासकरून महिलांमध्ये काही असे हार्मन्स असतात. जे वजन कमी करत नाहीत तर वाढवतात. अशावेळी यापासून सुटका करण्यासाठी काही व्यक्ती बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेतात. पण तरिदेखील वजन कमी होत नाही. 

यामुळे वाढतं वजन 

वजन वाढण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे, जेवण्याच्या वेळा न पाळणं आणि भूक नसतानाही खाणं. जर आपण हे सर्व कंट्रोल करू शकलो, तर काही प्रमाणात वजन कमी करण्यासाठी मदत होते. 

मेथीचे दाणे 

वजन कमी करण्यासाठी मेथीचे जाणे फायदेशीर ठरतात. तुम्ही भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा भूक शांत करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर करू शकता. तसेच हे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉल यांसारखे आजार रोखण्यासाठी मदत होते. 

फॅट बर्न करतं जीरं

तसं पाहायला गेलं तर जीऱ्याचा वापर जेवणाची चव वाढविण्यासाठी करण्यात येतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का? एक चमचा जीऱ्यामध्ये तीन पटींनी फॅट बर्न करण्याची क्षमता असते. जीरं आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्म सिस्टम व्यवस्थित ठेवण्याचं काम करतं. 

वेट लॉससाठी आलं उत्तम पर्याय

आल्याचा वापर अनेक पेय पदार्थांमध्ये करण्यात येतो. परंतु तुम्ही अद्याप तुम्हाला याचा फॅट बर्न करणाऱ्या फॉर्म्युला माहीत नाही. आलं ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे शरीराच्या वजनासोबतच पोटाची चरबीही कमी होते. 

लसूणही फायदेशीर 

अनेक रिसर्चमधून सिद्ध झाल्यानुसार, लसूण शरीरामध्ये जमा झालेले फॅट्स कमी करतो. याव्यतिरिक्त शरीराचं तापमान वाढवून फॅट कमी करण्याचा वेगही वाढवतो. याव्यतिरिक्त लसूण ब्लड प्रेशर, छातीत होणारी जळजळ, हृदय रोग यांसारख्या आजारांपासून बचाव करतो. 

टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. 


Web Title: These tips of weight loss are hidden in your kitchen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.