शरीरात झिंक कमी झाल्यावर दिसतात 'हे' संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 17:12 IST2024-08-10T17:12:05+5:302024-08-10T17:12:46+5:30
Zinc Deficiency : झिंकने डायबिटीजसारखा गंभीर आजारही बरा होऊ शकतो. पण झिंक कमी झाल्यावर शरीरात काय संकेत दिसतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शरीरात झिंक कमी झाल्यावर दिसतात 'हे' संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात!
Zinc Deficiency : आपल्या शरीरातील वेगवेगळे पोषक तत्व हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शरीरातील वेगवेगळ्या पोषक तत्वांपैकी एक जरी कमी झालं तर शरीरात काही समस्या होऊ लागतात. असंच एक पोषक तत्व म्हणजे झिंक. शरीरात झिंकची कमतरता झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, त्वचा कमजोर होणे, दृष्टी कमी होणे आणि इतरही अनेक समस्या होतात. मेडिकल एक्सपर्टनुसार, झिंकने डायबिटीजसारखा गंभीर आजारही बरा होऊ शकतो. पण झिंक कमी झाल्यावर शरीरात काय संकेत दिसतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
झिंक कमी झाल्यावर होणाऱ्या समस्या
केसगळती
शरीरात झिंक कमी झालं तर केसगळती आणि केस पातळ होण्याची समस्या होते. कारण झिंक हे डीएनए आणि आरएनएच्या प्रॉडक्शनसाठी गरजेचं असतं. जे केसांच्या पोर्सच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. शरीरात पुरेसं झिंक नसेल तर केसांची वाढ थांबते आणि असलेले केस गळू लागतात.
त्वचेसंबंधी समस्या
झिंक कमी झाल्यावर त्वचेवर चट्टे, पिंपल्ससह इतरही अनेक समस्या होतात. त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शरीरात पुरेसं झिंक असणं फार गरजेचं असतं. जर हे कमी झालं तर त्वचेच्या पेशींची रिपेअरिंग थांबून जाते.
सतत इन्फेक्शन होणं
शरीरात झिंक कमी झालं तर इम्युनिटी कमजोर होऊ लागते. अशात तुम्हाला सतत वेगवेगळ्या इन्फेक्शनची लागण होते. झिंक इम्यूनच्या क्रियामध्ये महत्वाची भूमिका बजावतं. शरीरात याचं प्रमाण कमी झाल्याने शरीराची बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता कमी होते.
भूक कमी लागते
जर अचानक तुमची भूक कमी झाली असेल तर हा शरीरात झिंकचं प्रमाण कमी झाल्याचा संकेत आहे. झिंक कमी झाल्याने टेस्ट आणि गंध घेण्याची क्षमताही कमी होते. ज्यामुळे भूक कमी लागते.
जखमा हळूहळू भरणे
झिंक सेल डिविजन आणि प्रोटीन सिंथसिससाठी गरजेचं असतं, जे जखमा भरण्यासाठी महत्वाचं आहे. अशात जर शरीरात झिंक कमी झालं तर जखमा भरण्यास जास्त वेळ लागतो. इतकंच नाही तर जखमांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोकाही वाढतो.
कशातून मिळतं झिंक
शेंगदाणे
शेंगदाण्यातून झिंक अधिक प्रमाणात मिळतं. यासोबतच आयर्न, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फोलिक अॅसिड आणि फायबर मिळतं. तसेच यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स हे सुद्धा आढळतात. शेंगदाण्यांमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं.
तीळ
तिळामध्येही अधिक प्रमाणात झिंक आढळतं. यासोबतच यात प्रोटीन, कॅल्शिअम, बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट इत्यादी तत्वेही मिळतात. तसेच तिळातून फोलिक अॅसिडही भरपूर प्रमाणात मिळतं.
अंड्याचा पिवळा भाग
डॉक्टर अंड्याचा पिवळा बलक खाण्यास मनाई करतात, कारण यात कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात असतं. पण तुम्हाला झिंगची गरज पूर्ण करायची असेल तर आहारात अंड्याच्या पिवळ्या बलकाचा समावेश करावा लागेल.
लसूण
लसणामध्येही भरपूर प्रमाणात झिंक आढळतं. सोबत रोज लसणाची एक कळी खाल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, बी आणि सी सोबतच आयोडीन, आयर्न, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्वेही मिळतात.