पॅरासिटामॉलचे अधिक सेवन केल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार; जाणून घ्या, आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:19 IST2024-12-23T14:18:33+5:302024-12-23T14:19:05+5:30

जर आपण रोज 4 ग्रॅम पॅरासिटामॉल घेतले, तर यकृत खराब होण्याची शक्यता वाढते.

These serious diseases can be caused by excessive consumption of paracetamol; Know what health experts say | पॅरासिटामॉलचे अधिक सेवन केल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार; जाणून घ्या, आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?

पॅरासिटामॉलचे अधिक सेवन केल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार; जाणून घ्या, आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?

पॅरासिटामॉल हे एक असे औषध आहे जे लोक, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीसाठी सर्रास घेताना दिसतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात, हे औषध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचे म्हण्यात आले आहे. ब्रिटनच्या नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी नुकताच खुलासा केला आहे की, पॅरासिटामॉलच्या अतिसेवनाने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. प्रामुख्याने, वृद्ध अथवा 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना किडनीच्या आजाराचा धोका वाढू शकतो. तसेच, कमी कालावधीत पॅरासिटामॉलचे अधिक सेवन केल्यास यकृतावरही वाईट परिणाम होऊ शकतो. अर्थात याच्या सेवनाने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

यकृत खराब होण्याचा दोका वाढतो -
जर आपण रोज 4 ग्रॅम पॅरासिटामॉल घेतले, तर यकृत खराब होण्याची शक्यता वाढते. कावीळ आणि यकृत खराब होण्यासारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात. काही प्रकरणांत, ही स्थिती वेनुसार बरीही होऊ शकते. मात्र धोका कायम राहतो. याशिवाय, त्वचेवर लाल पुरळ उठणे, श्वासनास त्रास होणे, अॅलर्जी, गॅस आणि ऍसिडिटी सारख्या समस्याही असू शकतात. क्वचित प्रसंगी, अल्प-मुदतीच्या वापरामुळे किडनीचे त्वरित नुकसान देखील होऊ शकते. तसेच काही प्रकरणांत, थोड्या वेळासाठीही याचा वापर केल्यास कीडनीवर लगेच परिणाम होऊ शकतो.

किडनी खराबही होऊ शकते - 
पॅरासिटामॉलचे दीर्घकाळ सेवन केल्याने यकृतावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.  दीर्घकाळात, ही स्थिती क्रॉन यकृत डिसीजचे रूपही धारण करू शकते. यामुळे यकृत पूर्णपणे खराब होऊ शकते. एवढेच नाही तर, यकृत बदलाचीही वेळ  येऊ शकते. याच बरोबर, पॅरासिटामॉलचा दीर्घकाळ वापर केल्याने किडनीही खराब होऊ शकते.  

हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो -
जे लोक नियमितपणे पॅरासिटामॉल घेतात त्यांच्या शरीराला याची सवय होते. परिणामी, आवश्यकता पडल्यास नेहमीचा डोस प्रभावी राहत नाही. यामुळे जेव्हा गरज असते तेव्हा औषध काम करत नाही. याशिवाय पॅरासिटामॉल दीर्घकाळ घेतल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. तसेच, नैराश्य आणि चिंता यांसारख्या समस्याही वाढू शकतात. यामुळे पॅरासिटामॉल आवश्यकतेनुसार आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसारच घ्यायला हवी. पॅरासिटामॉल अधिक प्रमाणावर घेणे अथवा विचार न करता त्याचे सेवन करणे, यामुळे गंभीर दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागू शकते.

(टीप - प्रिय वाचक, ही माहिती केवळ सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आपण आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा.)
 

Web Title: These serious diseases can be caused by excessive consumption of paracetamol; Know what health experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.