हिवाळ्यात गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने काय होतं? फायदे वाचाल तर रोज खाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:55 IST2024-12-19T15:47:11+5:302024-12-19T15:55:25+5:30
Jaggery and Ghee Benefits : गूळ आणि तुपाचं एकत्र सेवन केलं तर शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. अशात जाणून घेऊ याचे फायदे...

हिवाळ्यात गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने काय होतं? फायदे वाचाल तर रोज खाल!
Jaggery and Ghee Benefits : भारतीय किचनमध्ये गूळ आणि तुपाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. गूळ आणि तुपामुळे पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदातही गूळ आणि तुपाच्या मिश्रणाला प्रभावी औषधी मानलं आहे. गूळ आणि तुपाचं एकत्र सेवन केलं तर शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. अशात जाणून घेऊ याचे फायदे...
गूळ आणि तुपाच्या सेवनाने पचन तंत्र मजबूत राहण्यास मदत मिळते. गुळात फायबर आणि तुपात लॅक्सेटिव गुण असतात. जे बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. जेवणानंतर तूप आणि गुळाचा एक छोटा तुकडा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
गूळ आणि तुपात व्हिटॅमिन ई, झिंक आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे इम्यूनिटी मजबूत होते. नियमितपणे गूळ आणि तूप खाल्लं तर सर्दी व हिवाळ्यात होणाऱ्या समस्याही दूर करता येतात.
गूळ आणि तुपाच्या कॉम्बिनेशनने शरीर डिटॉक्स करण्यासही मदत मिळते. याने रक्त शुद्ध होतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच त्वचेचं सौंदर्य खुलवण्यास आणि पिंपल्स कमी करण्यासही याने मदत मिळते.
जर तुम्ही नेहमीच तणावात राहत असाल किंवा मूड स्विंगची समस्या होत असेल तर गूळ आणि तुपाचं सेवन करा. यातील अॅंटी-डिप्रेसेंट गुण मूड चांगला करतात आणि मानसिक तणाव कमी करण्यासही मदत करतात.
गूळ आणि तुपात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे हाडं आणि जॉईंट्स मजबूत होतात. संधिवात आणि जॉईंट्सच्या वेदनेपासून आरामही मिळतो.