अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीये वजन? आधी दूर करा पोटाच्या 'या' समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 12:33 IST2019-06-07T12:17:47+5:302019-06-07T12:33:23+5:30
वजन वाढू नये यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहारासोबतच नियमितपणे एक्सरसाइज करणे महत्त्वाचे आहे.

अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीये वजन? आधी दूर करा पोटाच्या 'या' समस्या!
(Image Credit : Dr. Anna Cabeca)
आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमध्ये वजन वाढणं एक सामान्य बाब आहे. वजन वाढू नये यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहारासोबतच नियमितपणे एक्सरसाइज करणे महत्त्वाचे आहे. पण हे सगळं करूनही काही लोक लठ्ठपणाचे शिकार होतात. मुळात शरीराचं वजन संतुलित ठेवण्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित होणं गरजेचं असतं. तुम्ही तुमचं शरीर स्लिम ठेवण्यासाठी काहीही करा, पण जर तुमची पचनक्रियाचं योग्यप्रकारे होत नसेल तर तुमचं वजन वाढणार आहेच. चला जाणून घेऊ पोटासंबंधी अशा समस्या ज्यांमुळे वजन वाढतं.
अॅसिड रिफ्लक्स
अॅसिड रिफ्लक्सला गॅस्ट्रोओसोफेजिअल रिफ्लक्स आजार नावानेही ओळखलं जातं. ही समस्या झाल्यावर छातीच्या खालच्या भागात जळजळ आणि वेदना होतात. यात होतं असं की, अॅसिड ओसोफेगसमध्ये परत जातं. जेवण केल्यानंतर जेवण आणि लाळ मिळून अॅसिडचा प्रभाव काही वेळात नष्ट करतात. पण जेवण पचल्यानंतर अॅसिडचं उत्पादन पुन्हा वाढू लागतं. यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा निर्माण होते आणि यानेच वजन वाढू लागतं.
अल्सर
अल्सर सामान्यपणे छोट्या आतड्या किंवा पोटाच्या आतील भागात होते. याने जास्त प्रमाणात अॅसिडची निर्मिती होते. अॅसिड रिफ्लक्सप्रमाणेच जेवण केल्यानंतर अल्सरपासून थोडा आराम मिळतो. पण याने पुन्हा भूक लागते आणि अधिक प्रमाणात खाल्ल्यावर अर्थातच तुमचं वजन वाढतं.
बॅक्टेरिया
आपल्या आतड्यांमध्ये चांगले आणि खराब असे दोन्हीप्रकारचे बॅक्टेरिया आढळतात. चांगले बॅक्टेरिया सूज करण्यास मदत करतात. पण जेव्हा आतड्यांमध्ये बॅक्टेरियांची संख्या वाढते, तेव्हा वजन वाढू लागतं. हे बॅक्टेरिया मेथेन गॅसची निर्मिती वाढवतात आणि छोट्या आतड्यांच्या प्रक्रियांना हळुवार करतात, ज्यामुळे मेटाबॉलिज्म संथ होतं. आणि याचा प्रभाव तुमच्या इन्सुलिन आणि लेप्टिनवरही पडतो. ज्यामुळे भूक अधिक लागते आणि यामुळेच वजन वाढतं.
इरिटेबल बॉवेल सिंड्रोम
ही आतड्यांशी संबंधित सर्वात कॉमन समस्या आहे. जेवणाची संवेदनशीलता आणि चांगल्या बॅक्टेरियाच्या असंतुलनामुळेच पचनासंबंधी समस्या निर्माण होते. या कारणाने पोटात सूज होऊ लागते आणि हेच वजन वाढण्याचं कारण ठरतं.
जुना आजार
एखाद्या जुन्या आजाराने ग्रस्त व्यक्तीला उपचाराआधी स्टेरॉइड दिलं जातं. या कारणाने अधिक कार्बोहायड्रेटयुक्त आहार करण्याची इच्छा निर्माण होते. आणि अधिक प्रमाणात कार्बोहायड्रेट घेतल्याने वजन वाढतं.