शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

रखरखत्या उन्हात डोळ्यांचे होते खुप मोठे नुकसान, घातक परिणाम होण्याआधी घ्या 'ही' काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 5:56 PM

उन्हाळ्यात उष्ण वाऱ्यांमुळे त्वचेसोबतच डोळ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या. डोळे निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टींची (Eye Care Tips in Summer) काळजी घ्या.

कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत. उष्ण वाऱ्यात घराबाहेर पडतानाही शंभर वेळा विचार करावा लागतो. उष्माघातासारख्या प्रकारासोबतच कडक उन्हाचा डोळ्यांवरही घातक परिणाम होतो. उन्हाळ्यात, बहुतेक लोकांना डोळे कोरडे होणे, डोळ्यात वेदना, अ‌ॅलर्जी, डोळ्यात बोचणे, कॉर्नियाच्या समस्या इत्यादींचा त्रास होतो. उन्हाळ्यात अति उष्ण वारे आणि हानिकारक अतिनील किरणांमुळे डोळ्यांचा कॉर्निया (Cornea Burn) जळण्याचीही शक्यता असते. यामुळे अस्पष्ट दृष्टी, डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि डोळ्यांमध्ये वेदना होऊ शकतात. उन्हाळ्यात उष्ण वाऱ्यांमुळे त्वचेसोबतच डोळ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या. डोळे निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टींची (Eye Care Tips in Summer) काळजी घ्या.

उष्ण वाऱ्यापासून डोळ्यांचे संरक्षण करण्याचे उपाय

सनग्लासेस लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका -TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ज्याप्रमाणे त्वचेसाठी सनस्क्रीन आवश्यक आहे, त्याचप्रमाणे डोळ्यांनाही उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी संरक्षणात्मक कवच आवश्यक आहे. दिवसा घराबाहेर पडल्यास डोळे कोरडे होणे, कॉर्निया जळणे यासारख्या समस्या टाळण्यासाठी चांगल्या दर्जाचे सनग्लासेस घाला. हानिकारक अतिनील किरण डोळ्यांना नुकसान करतात, ज्यामुळे डोळे कोरडे होऊ शकतात.

भरपूर द्रव पदार्थ पिणे सुरू ठेवा -उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी द्रवपदार्थाचे सेवन करणे खूप गरजेचे असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी द्रवपदार्थाचा जास्त वापर करणे देखील चांगले असते. उन्हाळ्यात डोळ्यांतील टियर फिल्मचे बाष्पीभवन होत असल्याने डोळ्यात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. अतिरिक्त अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन देखील या दिवसात टाळले पाहिजे कारण यामुळे निर्जलीकरण वाढू शकते.

डोळ्यात थेंब टाका -हायड्रेटेड राहण्यासोबतच उन्हाळ्यात डोळ्यांमध्ये आय ड्रॉप्स टाकणेही गरजेचे आहे. त्यामुळे डोळ्यांमध्ये ओलावा (lubricated) कायम राहतो. डोळ्यांच्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आय ड्रॉप्स खरेदी करा आणि त्यांचा नियमित वापर करा. उष्ण वाऱ्यामुळे डोळे कोरडे होतात, अशा परिस्थितीत आय ड्रॉप्स वापरल्याने कोरडेपणा, खाज सुटणे, जळजळ यासारख्या समस्या होणार नाहीत.

डोळ्यांजवळ सनस्क्रीन लावू नका -उन्हाळ्याच्या हंगामात अतिरिक्त काळजी घेण्यासाठी आणि त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावत असाल, तर लक्षात ठेवा की ते डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर, पापण्यांच्या भागावर लावू नये. कारण, सनस्क्रीनमध्ये एसपीएफचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे डोळ्यांना हानी पोहोचते.

दुपारी बाहेर जाताना -

दिवसा 11 ते 4 वाजेपर्यंत शक्यतो घराबाहेर पडू नका. महत्वाच्या कामांसाठी जावं लागत असेल तर छत्री, चष्मा, स्कार्फ, पाणी अशा सर्व गोष्टी सोबत ठेवा. जास्त वेळ उन्हात फिरण्याऐवजी सावलीत बसा. हा असा काळ आहे जेव्हा सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरणे अत्यंत तीव्र आणि हानिकारक असतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स