दुर्मीळ रक्तविकारांवरील उपचारात बोन मॅरो ट्रान्स्प्लांटचे युग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:09 IST2025-06-10T12:07:59+5:302025-06-10T12:09:33+5:30

Bone Marrow Transplant : बोन मॅरो अत्यावश्यक असलेल्या रक्तपेशी निर्माण करते. जेव्हा हे कार्य थांबते, तेव्हा आरोग्यदायी बोन मॅरोची पुनर्स्थापना करणे आवश्यक ठरते. यासाठीच बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा वापर केला जातो.

The importance of bone marrow transplant in the treatment of rare blood disorders | दुर्मीळ रक्तविकारांवरील उपचारात बोन मॅरो ट्रान्स्प्लांटचे युग

दुर्मीळ रक्तविकारांवरील उपचारात बोन मॅरो ट्रान्स्प्लांटचे युग

(डॉ. प्रियतेश द्विवेदी, हेमेटो-ऑन्कोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एचसीजी कॅन्सर सेंटर, नाशिक)

Bone Marrow Transplant : हृदय आणि मेंदू हे मानवी शरीरातील सर्वांत महत्त्वाचे अवयव मानले जातात. तथापि, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्वांत शक्तिशाली उपचार प्रणालींपैकी एक आपल्या हाडांच्या आत दडलेली आहे, अस्थिमज् अर्थात बोन मॅरो. ही स्पंजाप्रमाणे असणारी ऊती शरीराला आवश्यक असणाऱ्या रक्तपेशी तयार करण्याचे काम करते. त्यामुळे प्रतिकारशक्ती, ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे काम सुरळीत चालते. मात्र, जेव्हा बोन मॅरोचे कार्य बाधित होते, तेव्हा दुर्मीळ रक्तविकार प्राणघातक ठरू शकतो. अशा वेळी ‘बोन मॅरो ट्रान्स्प्लांट’ आशेचा किरण बनतो.

दुर्लभ रक्तविकार म्हणजे काय?

दुर्लभ रक्तविकार म्हणजे असे विकार जे रक्तपेशी (लाल, पांढऱ्या वा प्लेटलेट्स) तयार होण्यात अडथळा आणतात किंवा त्यांच्या गुणवत्तेत दोष निर्माण करतात. यामध्ये एप्लास्टिक अ‍ॅनिमिया, थॅलेसेमिया, सिकल सेल डिसीज, प्राथमिक इम्युनोडिफिशियन्सी डिसऑर्डर्स व काही दुर्मीळ रक्ताचा कर्करोग यांचा समावेश होतो. हे विकार प्रामुख्याने अनुवंशिक असतात किंवा लहानपणीच दिसून येतात. काही वेळा संसर्ग, पर्यावरणीय घटक किंवा जनुकीय बदलांमुळे नंतरही होऊ शकतात.
दुर्लभ हे विशेषण या विकारांसाठी त्यामुळेच वापरले जातात. कारण ते उपचारासाठी खूप अवघड असतात. या विकारांसाठी वारंवार हॉस्पिटलला भेट देणे, आयुष्यभर औषधे आणि सतत देखरेख आवश्यक असते. हा प्रकार अनेक कुटुंबांसाठी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या खूपच आव्हानात्मक ठरतो.

बोन मॅरोचे महत्त्व

बोन मॅरो अत्यावश्यक असलेल्या रक्तपेशी निर्माण करते. जेव्हा हे कार्य थांबते, तेव्हा आरोग्यदायी बोन मॅरोची पुनर्स्थापना करणे आवश्यक ठरते. यासाठीच बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा वापर केला जातो. यात निरोगी स्टेम सेल्स दानशूर व्यक्तीकडून किंवा स्वतःच्या शरीरातून घेतलेल्या असतात. त्या शरीरात पुन्हा प्रत्यारोपित केले जातात; त्यामुळे बोन मॅरोचे कार्य पुन्हा पूर्ववत होते. ही प्रक्रिया नवीन नसली, तरी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ती आता अधिक सुरक्षित, परिणामकारक झाली आहे.

बोन मॅरो ट्रान्स्प्लांटमधील नवकल्पना

१) सुधारित डोनर मॅचिंग : पूर्वी संपूर्ण जुळणारा (संपूर्ण मॅच) डोनर, सामान्यतः सख्खा भाऊ किंवा बहीण असणे आवश्यक होते. आता हॅपलो-आयडेंटिकल ट्रान्स्प्लांटच्या मदतीने अर्धवट जुळणारा नातेवाइकही डोनर बनू शकतो.

२) ग्राफ्ट रिजेक्शन कमी करणे : ‘ग्राफ्ट व्हर्सेस होस्ट डिसीज’ या दुष्परिणामांना टाळण्यासाठी पूर्व-उपचार पद्धती, सुधारित इम्युनोसप्रेसिव्ह औषधे आणि ट्रान्स्प्लांटनंतरची निगा अधिक प्रभावी झाली आहे.

३) आधुनिक उपचारांची भर : संसर्ग नियंत्रण, पोषण सहाय्य, मानसिक सल्ला इत्यादी घटक उपचाराच्या यशात भर घालतात.

बोन मॅरो ट्रान्स्प्लांट केव्हा करावे?

बोन मॅरो ट्रान्स्प्लांट ही पहिली उपचार पद्धत नसते. मात्र, जेव्हा दुर्मीळ रक्तविकार औषधांना प्रतिसाद देत नाहीत किंवा अधिक गंभीर होतात, तेव्हा ट्रान्स्प्लांट एक उपाय ठरतो; केवळ लक्षणे कमी करण्याचा नव्हे, तर संपूर्ण बरे होण्याचा.

उदाहरणार्थ..थॅलेसेमिया मेजर किंवा सिकल सेल डिसीजसारख्या जन्मजात विकारांमध्ये लवकर बोन मॅरो ट्रान्स्प्लांट केल्यास आयुष्यभर रक्तस्राव टाळता येतो आणि अवयवांचे नुकसानही कमी होते. एप्लास्टिक अ‍ॅनिमियासारख्या विकारांमध्ये, जिथे बोन मॅरो पूर्णपणे कार्य करणे थांबवते, तेथे बोन मॅरो ट्रान्स्प्लांट जीवनरक्षक ठरते.
महत्त्वाचे म्हणजे, उपचार लवकर सुरू करणे. अनेक कुटुंबे औषधांवरच भर देतात आणि ट्रान्स्प्लांट टाळतात. जेवढ्या लवकर ही प्रक्रिया केली जाते, तेवढे परिणाम अधिक चांगले मिळतात.

भारतातील दृष्टिकोन

भारतामध्ये बोन मॅरो ट्रान्स्प्लांटबाबतची जनजागृती आणि उपचारकेंद्रांची संख्या वाढत असली, तरी अजूनही अनेक अडचणी आहेत. भीती, खर्चाची चिंता किंवा माहितीचा अभाव यामुळे अनेक कुटुंबे हे टाळतात. सुदैवाने, आता अनेक रुग्णालये हेमॅटॉलॉजिस्ट, ट्रान्स्प्लांट कोऑर्डिनेटर, पोषणतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश असलेल्या टीमच्या माध्यमातून सेवा देतात. जनजागृती मोहिमाही वाढल्या आहेत, त्यामुळे डोनरद्वारे ट्रान्स्प्लांटही शक्य होत आहे.

महत्त्वाचे म्हणजे ट्रान्स्प्लांट म्हणजे जटील, धोकादायक शस्त्रक्रिया नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रामुळे जलद बरे होणे, साइड इफेक्ट्सचे उत्तम नियंत्रण आणि उपचारानंतर अधिक दर्जेदार जीवनशैली शक्य आहे.

नवजीवनाची संधी

बोन मॅरो ट्रान्स्प्लांट ही एक वैद्यकीय प्रक्रिया नसून, नवजीवनाची संधी आहे. दुर्मीळ रक्तविकारांनी त्रस्त असलेल्या अनेक बालकांसाठी आणि प्रौढांसाठीही हॉस्पिटल, बेड, इंजेक्शन्स आणि सतत थकव्याच्या त्रासातून मुक्तता आहे. तुम्ही किंवा तुमच्या प्रियजनांना असा रक्तविकार आहे व पारंपरिक उपचार निष्फळ ठरत असतील, तर थांबू नका. त्वरित हेमॅटॉलॉजिस्ट किंवा ट्रान्स्प्लांट तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळेत मिळालेले मार्गदर्शन निराशा टाळू शकते.

Web Title: The importance of bone marrow transplant in the treatment of rare blood disorders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.