शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

देशासमोर 'लठ्ठपणा'चे महासंकट! लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत वाढता धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 07:52 IST

Obesity Crisis India 2026: देशात लठ्ठपणा धोकादायक वेगाने वाढत असून तो आता सर्व वयोगटांसाठी गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हान बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: देशात लठ्ठपणा धोकादायक वेगाने वाढत असून तो आता सर्व वयोगटांसाठी गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हान बनला आहे. चुकीचा आहार, बैठी जीवनशैली आणि अति-प्रक्रिया अन्नपदार्थांच्या (यूपीएफ) वाढत्या सेवनामुळे मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याचा इशारा संसदेत गुरुवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आला आहे.

आहारातील सुधारणा सार्वजनिक आरोग्याची प्राधान्याची बाब ठरवावी, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयतिकार, उच्च रक्तदाब आणि मानसिक विकारांचा धोका शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांत वाढला आहे

आकडेवारी काय सांगते ?

राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणानुसार, देशातील २४% महिला आणि २३% पुरुष अधिक वजनाचे किंवा लठ्ठ आहेत. २०१५-१६ च्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. ५ वर्षांखालील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ३.४ टक्क्यांवर पोहोचले आहे. २०३५ पर्यंत भारतातील लठ्ठ मुलांची संख्या ८.३ कोटी होण्याचा भीतीदायक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

'यूपीएफ'चा विळखा आणखी घट्ट; तब्बल ४० पटीने वाढली विक्री

- भारतात अति-प्रक्रिया अन्नपदार्थाची (चिप्स, शीतपेये, पॅकेज्ड फूड) बाजारपेठ अत्यंत वेगाने विस्तारत आहे.- २००६ मध्ये या पदार्थांची विक्री फक्त ०.९ अब्ज डॉलर होती, ती २०१९ मध्ये ३८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. म्हणजेच त्यात ४० पटीने वाढ झाली आहे.- हे पदार्थ पारंपरिक आणि पौष्टिक आहाराची जागा घेत असल्याने आरोग्याचा दर्जा खालावला आहे.

जाहिरातींवर बंदीची मागणी

आर्थिक पाहणी अहवालात केवळ समस्या मांडली नाही, तर काही कडक उपाययोजनाही सुचविल्या आहेत. त्यात सकाळी ते उशिरा रात्रीपर्यंत दाखविल्या जाणाऱ्या अस्वास्थ्य कर खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा विचार करावा. लहान मुलांच्या दूध आणि पेयांच्या मार्केटिंगवर कडक निर्बंध हवेत. नागरिकांनी आपल्या आहारात योग्य पोषक घटकांचा समावेश करणे ही आता केवळ वैयक्तिक गरज नसून राष्ट्रीय प्राधान्य असायला हवे.

English
हिंदी सारांश
Web Title : India faces obesity epidemic: Rising threat from children to elderly.

Web Summary : India's obesity is surging, posing health risks like diabetes and heart disease, says a report. 24% of women and 23% of men are overweight, with childhood obesity also increasing. Ultra-processed food sales have skyrocketed. The report suggests ad bans on unhealthy foods and stricter marketing rules.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स