Tears are good for health : फक्त हसणंच नाही तर रडणंसुद्धा आरोग्यासाठी हिताचं; रडण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 10:48 AM2021-03-28T10:48:30+5:302021-03-28T11:07:22+5:30

Tears are good for health : रडल्यामुळे माणसाच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे ताण तणाव कमी होणं सोपं होतं. 

Tears are good for health : Tears are good for human health know benefit stress eyes | Tears are good for health : फक्त हसणंच नाही तर रडणंसुद्धा आरोग्यासाठी हिताचं; रडण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्

Tears are good for health : फक्त हसणंच नाही तर रडणंसुद्धा आरोग्यासाठी हिताचं; रडण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

(Image Credit- You tube)

हसण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील, नेहमीच हसण्याचे फायदे सांगितले  जातात. हसल्यानं मुड चांगला राहतो, हसल्यामुळे हृदय निरोगी राहते, असे फायदे तुमच्या ऐकण्यात असतीलच. पण तुम्हाला माहित आहे का रडल्यामुळेही शरीराला अनेक फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला रडल्यानं शरीराला कसा फायदा मिळतो याबाबत सांगणार आहोत. 

शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडतात

जेव्हा माणूस ताण तणावात असतो तेव्हा त्याच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे टॉक्सिन्स तयार होत असतात. या टॉक्सिन्सना वेळीच शरीराच्या बाहेर काढलं नाही तर नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. रडल्यामुळे माणसाच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे ताण तणाव कमी होणं सोपं होतं. 

चांगली झोप येते

अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार रडल्यानं झोप चांगली येते.  रडल्यामुळे माणसाचं डोकं शांत राहतं आणि त्यामुळेच चांगली झोप येते.  लहान मुलांमध्ये तुम्ही अनेकदा पाहिलं असेल रडून झाल्यानंतर मुलं शांतपणे झोपतात. 

ताण तणावापासून आराम मिळतो

जेव्हा तुम्ही खूप ताण तणावाखाली असता तेव्हा मेंदू खूप जड असल्यासारखा वाटतो. अशावेळी रडल्यानं  ताण तणाव कमी होतो. शरीरात ऑक्सिटोक्सिन आणि एंडोर्फिन नावाचे केमिकल रिलिज होते. त्यामुळे मूड चांगला राहतो आणि मनातील निराशा बाहेर पडते, यामुळे मन साफ होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर

वाढत्या प्रदूषणामुळे आणि मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर नकारात्मक परिणाम होतो.  जेव्हा माणसाला रडायला येते तेव्हा त्याच्या डोळ्यातून प्रदूषित कण बाहेर पडतात आणि डोळे स्वच्छ होतात. म्हणून डोळ्यात पाणी येणं फार महत्वाचं आहे. रडण्यामुळे मेंदू  योग्य पद्धतीने काम करते.

एका अभ्यासातून स्पष्ट झाल्यानुसार, स्ट्रेसमुळे रडणं आणि डोळ्यांना होणाऱ्या त्रासामुळे रडणं यामध्ये फरक आहे. जेव्हा आपण रडतो तेव्हा शरीरातून एड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक आणि ल्यूसीन नावाचे स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतात. पण जर डोळ्यांना त्रास होत असेल आणि त्यामुळे जर पाणी बाहेर आलं तर मात्र असं काहीही होत नाही. अश्रू डोळ्यांमध्ये असणाऱ्या मेमब्रेनला ड्राय होऊ देत नाही. हे ड्राय झाल्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे काहींना कमी दिसण्याची समस्या होऊ शकते. मेमब्रेन जर व्यवस्थित असेल तर डोळ्यांची दृष्टी व्यवस्थित असते. ‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित

अश्रूंमध्ये लायसोजाइम नावाचं तत्व असतं. जे वातावरणातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी सहायक ठरतात. यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होत नाही आणि डोळे हेल्दी राहण्यास मदत होते. आपण रडतो त्यावेळीच लायसोजाइम अश्रूंद्वारे डोळ्यांतून बाहेर पडतात.  अनेकदा काही लोकं आपला राग आणि ताण मनामध्येच ठेवतात. असे केल्यानं अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. 
जर ताण नाहीसा करायचा असेल किंवा रडावेसे वाटत असेत तर रडणं गरजेचं आहे. काही लोकांना वाटतं की, रडल्यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचेल. पण असा विचार करणं योग्य नाही. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर अनेक लोकं विविध प्रकारची औषधं, योग इत्यादीचा आधार घेतात. परंतु, असे करण्यापेक्षा रडणं सर्वात चांगला उपाय मानला जातो. CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा 

Web Title: Tears are good for health : Tears are good for human health know benefit stress eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.