आठवड्यातून 5 वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्यास होतो हा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 16:13 IST2018-06-25T16:12:20+5:302018-06-25T16:13:01+5:30
इतकेच नाहीतर यामुळे टेस्टिकल्सचं तापमान वाढतं आणि त्यामुळे स्पर्म काऊंट कमी होतो.

आठवड्यातून 5 वेळा गरम पाण्याने आंघोळ केल्यास होतो हा फायदा
मुंबई : वेगवेगळ्या अभ्यासांमधून हे समोर आलंय आणि अनेक तज्ज्ञही मानतात की, गरम पाण्याने आंघोळ केल्याने अनेक नुकसान होतात. याने शरीराची वरील त्वचा कमजोर होऊ लागते. त्यासोबतच काहींना खाज आणि इन्फेक्शनचीही समस्या होऊ शकते.
इतकेच नाहीतर यामुळे टेस्टिकल्सचं तापमान वाढतं आणि त्यामुळे स्पर्म काऊंट कमी होतो. अशातच एका रिसर्चमधून समोर आले आहे की, आठवड्यातून पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्यास हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक रोखण्यास मिळते.
एका संशोधनात आढळलं की, रोज 41 डिग्री सेल्सिअस गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदयासाठी चांगलं असतं. शोधकर्त्यांनुसार, नियमीतपणे गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदय चांगलं राहतं आणि ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. इतकेच नाहीतर नियमीत गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्यांना तणावाचाही कमी सामना करावा लागतो.
काय सांगतो रिसर्च?
युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलच्या संशोधनकर्त्यांनुसार, जे लोक आठवड्यातून चार ते सात वेळ गरम पाण्याने आंघोळ करतात. त्यांच्या तुलनेत एकदा गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्यांना स्ट्रोकचा धोका अधिक असतो.