शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

तिशीनंतरचे मातृत्व काळजीचे : योग्य वयातचं घ्या मातृत्वाचा आनंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 10:01 AM

उशिरा मूल होऊ देण्याचा निर्णय मानसिकदृष्ट्या तर सोपा नसतोच पण आईसोबत बाळाच्याही आरोग्याचे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होऊ शकतात

मातृत्व ही निसर्गाने स्त्री'ला दिलेली सुंदर देणगी आहे. त्यामुळे स्त्री-पुरुषावर पालकत्व कधीही लादले जाऊ नये त्याचप्रमाणे त्यांनीही ते योग्य वयातच स्वीकारावे. उशिरा मूल होऊ देण्याचा निर्णय मानसिकदृष्ट्या तर सोपा नसतोच पण आईसोबत बाळाच्याही आरोग्याचे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होऊ शकतात.त्यामुळे वयाची तीस वर्ष पूर्ण होण्याच्या आधी आई होण्याचा पर्याय सर्वच अर्थानी योग्य ठरतो. 

गर्भधारणेकरिता योग्य वय कोणते ? 

२१ वर्षांनंतर सर्वसाधारणपणे स्त्रीचे शरीर गर्भधारणेस तयार होते. मात्र सध्याचा काळ बघता शिक्षण आणि करिअरमध्ये योग्य समतोल राखून २४ ते २८ वर्षांपर्यंतचे वय गर्भधारणेस योग्य ठरते. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने याबाबत योग्य विचार करून वेळप्रसंगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा. 

गर्भधारणा उशिरा झाल्यास काय तोटे असतात ?

गर्भधारणा उशिरा केल्यास प्रचंड तोटे असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता कमी होत जाते. स्त्रीला डायबेटीस, बी पी, थायरॉईडसारखे आजार होऊ शकतात.योग्य वयात प्रेग्नन्सी काळात शरीर सुलभरितीने मदत करते त्याप्रमाणे वाढत्या वयात होत नाही. 

वयाची तिशी उलटल्यावर गर्भधारणेच्यादृष्टीने स्त्रीला कोणत्या समस्या भेडसावतात ?

गर्भशयात स्त्रीबीज तयार होण्याची क्षमता ३० वर्षांनंतर कमी होते. त्यामुळे अनेकदा गर्भ राहात नाही.त्यातच बाळाला व्यंग असण्याची चिन्हेही वाढतात.त्या काळात गर्भपाताची काही शक्यता प्रमाणात वाढते. डाउन्स सिंड्रोमसारखे आजारही होऊ शकते. 

डाएट केल्यास त्याचा परिणाम गर्भधारणेवर होऊ शकतो का ?

नक्कीच होतो. तुम्ही केलेले क्रॅश डाएट शरीरावर परिणाम करत असते.अति आणि चुकीच्या पद्धतीने केलेले डाएट शरीराचा आणि हार्मोन्सचा समतोल बिघडवू शकते.जसे वजन घटवण्यासाठी केलेले अतिरेकी डाएट भयानक असते त्याचप्रमाणे अति वजनही गर्भधारणेत अडचणीचे ठरते. 

गर्भधारण होत नसल्यास सुरुवातीला कोणते उपचार घ्यावेत ?

अनेकदा मूल होत नसेल तर थेट आयव्हीएफ ट्रीटमेंट घ्यावी लागेल असा अनेक जोडप्यांचा समज असतो. हा मोठा गैरसमज आहे. सुरुवातीला अगदी साध्या रक्ताच्या चाचण्या आणि सोनोग्राफीतही अडचणीचे निदान होऊन उपचार घेता येऊ शकतात. ते फार खर्चिकही नसतात. 

मार्गदर्शन डॉ नमिता मोकाशी - भालेराव 

स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, पुणे 

टॅग्स :Puneपुणेpregnant womanगर्भवती महिलाHealth Tipsहेल्थ टिप्स