हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरू शकतं जीवघेणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 18:01 IST2020-04-21T17:59:38+5:302020-04-21T18:01:04+5:30
वयस्कर माणसांना नाहीतर मध्यम वयाच्या लोकांना सुद्धा हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.

हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरू शकतं जीवघेणं
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत अमियमीत खाणं पिणं, झोपेची कमतरता आणि आहार घेण्याच्या पद्धतीत ताळमेळ नसणं यांमुळे वयस्कर माणसांना नाहीतर मध्यम वयाच्या लोकांना सुद्धा हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. ४० ते ६५ या वयोगटात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असतं. हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही संकेत येऊ लागतात. आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक यायच्या आधी कोणती लक्षणं दिसतात याबाबत सांगणार आहोत.
कोणताही अटॅक मेंदूचा असो किंवा हार्टचा अचानक येत असतो. काही आठवडे आधी शरीरात बदल दिसून येतात. चालताना छाती खूप जास्त हेवी झाल्यासारखी वाटते. त्याला एंजायना पेन असं सुद्धा म्हणतात. छाती जड झाल्यासारखी वाटणं हे हृदयाच्या आजारांचे मोठं लक्षण आहे.
अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. चालताना, जिने चढताना- उतरताना दम लागतो. या समस्येकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करता कामा नये अनेकदा घश्यात जळजळ सुद्धा होत असते. काहीही खाताना जळजळीचा सामना करावा लागतो. काहीही खाल्यानंतर अशी समस्या जाणवत असेल तर हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. याशिवाय काहीही खाल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणं, छातीत जळजळणं यामुळे हार्टचे इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते.
चक्कर, उलटी, पोटाच्या समस्या उद्भवतात. सगळ्यात महत्वाचं लक्षणं म्हणजे विकनेस, थकवा खूप जाणवतो. या लक्षणांव्यतिरिक्त काही लोकांना डावा हात दुखण्याची समस्या उद्भवते. साधारणपणे चालताना ही समस्या वाढते. जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त खोकला कफची समस्या असून हाता-पायांना सूज येत असेल तर गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. ( हे पण वाचा-कोरोनाला घाबरण्याआधी इन्फेक्शनचा धोका कोणाला जास्त असू शकतो, जाणून घ्या)
अनेकाना कोणतेही शारीरिक श्रमाचे काम न करता घाम येण्याची समस्या जाणवते. महिलांमध्ये आणि पुरूषांमध्ये हार्ट अटॅकची कारणं वेगवेगळी असतात. मादक पदार्थांचे सेवन, लठ्ठपणा, आनुवांशिकता ही कारणं हार्ट अटॅकची असू शकतात. अशी लक्षणं दिसत असल्यास वेळीच तज्ञांशी संपर्क करून तपासणी करून घ्या. हे पण वाचा-Coronavirus : कोरोना व्हायरस इम्यून सिस्टीमला कन्फ्यूज करतो आणि सुरू होतं जीवन-मृत्यूचं 'युद्ध'!)