शिकार होण्याआधी सगळ्यांनाच माहीत हवीत साधी वाटणारी थायरॉईची 'ही' लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 10:18 AM2020-04-03T10:18:20+5:302020-04-03T10:28:06+5:30

थायरॉईडच्या आजाराला हायपोथायरॉयडिजमच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

Symptoms and prevention of thyroid disease myb | शिकार होण्याआधी सगळ्यांनाच माहीत हवीत साधी वाटणारी थायरॉईची 'ही' लक्षणं

शिकार होण्याआधी सगळ्यांनाच माहीत हवीत साधी वाटणारी थायरॉईची 'ही' लक्षणं

googlenewsNext

सध्या बदलत्या जीवनशैलीत नकळतपणे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक म्हणजे थायरॉईडचा आजार मोठ्या संख्येने लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहे. महिलांना या आजाराचा सामना जास्त करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला या आजाराच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. थायरॉईडच्या आजाराला हायपोथायरॉयडिजमच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या आजारााला घाबरण्याचं काही कारण नाही.

थारॉईडची लक्षणं

वेळोवेळी या आजाराचे उपचार त्वचा कोरडी पडणे, आवाज बदल होणं, केस गळणं, मासपेशींचे दुखणं, थकवा जाणवणं, जास्त थंडी सहन न होणं, झोप न येणं, मासिक पाळी अनियमीत होणं, स्तनांमधून पांढरा स्त्राव बाहेर येणं, घाम कमी येणं, त्वचेचा रंग बदलणं ही समान्य लक्षणं तसंच एग्जायटी, मेमरी लॉस, सुस्ती येणं, विसरण्याची सवय अशी लक्षणं दिसून येतात. 

अमेरिकन थाइरॉयड एसोशिएशनच्या मते  वयाच्या ३५ वर्षांनंतर थायरॉइडची तपासणी सुरू करायला हवी. सतत ५ वर्ष नियमित तपासणी केल्याने तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता थायरॉईड असलेली व्यक्ती कोमात जाण्याची सुद्धा शक्यता असते. तसंच मानसिक संतुलन सुद्धा बिघडू शकतं. प्राइमरी हाइपोथायरॉइडिज़ममध्ये टीएसएच लेवल आणि टी-४ यांची तपासणी केली जाते. हा आजार जेव्हा जास्त होतो. तेव्हा यांचा स्तर सामान्य स्थितीपेक्षा जास्त किंवा कमी झालेला असतो. 

थायरॉईडपासून वाचण्यासाठी उपाय

थायरॉईडला दूर ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. समतोल आहार घेताना दररोज चार ते पाच प्रकारच्या भाज्या आणि तीन ते चार प्रकारची फळं खावी.

प्रक्रिया केलेले अन्न संतुलित आहारांत समाविष्ट केले जाऊ शकत नाही. ज्या अन्नात साखर, रंग, कृत्रिम चव असते ते आहारात समाविष्ट करू नये. आहारात चरबीयुक्त, साखरयुक्त पदार्थांचा वापर टाळावा.

थायरॉईड समस्या निर्माण होण्याला लठ्ठपणा कारणीभूत ठरतो. म्हणून दररोज व्यायाम आणि योग्य आहार महत्त्वाचा आहे. एका अभ्यासानुसार, ४० बीएमआय किंवा त्यापेक्षा अधिक बीएमआय असलेल्या लोकांना थायरॉईडची समस्या निर्माण होते.

शरीरात आयोडीनचं प्रमाण कमी झालं तर थायरॉईडची समस्या निर्माण होतो. वृद्धांमध्ये विशेषतः महिलांमध्ये ही समस्या निर्माण होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यासाठी आयोडीनयुक्त पदार्थ खायला हवेत.

Web Title: Symptoms and prevention of thyroid disease myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.