शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लू- भाग १

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

सहा वर्षांर्ंपासून मनपा कुंभकर्णी झोपेत- स्वाईन फ्लू कसा रोखणार ? : २००९ पासून उपाय योजलेच नाहीत नागपूर : उपराजधानीत स्वाईन फ्लूचा प्रकोप आजच एकाएकी वाढला नाही. आजच रुग्ण आढळून आले असेही नाही. नागपुरात २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु सहा वर्षानंतरही स्वाईन फ्लूचा रुग्ण भरती करून ...


सहा वर्षांर्ंपासून मनपा कुंभकर्णी झोपेत
- स्वाईन फ्लू कसा रोखणार ? : २००९ पासून उपाय योजलेच नाहीत
नागपूर : उपराजधानीत स्वाईन फ्लूचा प्रकोप आजच एकाएकी वाढला नाही. आजच रुग्ण आढळून आले असेही नाही. नागपुरात २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु सहा वर्षानंतरही स्वाईन फ्लूचा रुग्ण भरती करून त्यावर उपचार करणारी यंत्रणा महापालिकेने उभी केलेली नाही. आलेले रुग्ण मेडिकल, मेयोकडे ढकलण्यापलिकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुसरे काहीच केलेले नाही. महापालिकेची ही उदासीनता आज अनेकांच्या जीवावर उठली आहे.
महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टनुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर मनपाला पडलेला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती प्राप्त झाली आहे. शहराची लोक संख्या ३० लाखाच्यावर गेली असताना महापालिका फक्त तीन रुग्णालयांतून आरोग्य सेवा देत आहे. त्यांच्या मदतीला ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानीचे असे एकूण २९ बाह्यरुग्ण विभाग आहेत. असे असतानाही मागील तीन वर्षात ७० हजार ७०० रुग्णांची तपासणी करण्यात आली तर यातील फक्त २६५९ रुग्णांना भरती करून घेण्यात आले. महापालिकेच्या इंदिरा गांधी रु ग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात एका दिवशी सरासरी ६५ ते ७० रु ग्णांची तपासणी केली जाते. यावरून मनपामध्ये आरोग्यकारक परिस्थितीचा अभाव व जोडीला आरोग्य सेवांची भीषण दूरवस्था व विषमता दिसून येते.

चौकट...

- नमुने घेण्याची सोयही नाही
स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांवर उपचारासोबत त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविणे महत्त्वाचे असते. परंतु महापालिकेचा आरोग्य विभाग संशयित रुग्णाचे नमुनेही घेत नाही. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातच(मेयो) संशयित रुग्णाला पाठविले जाते. महापालिका प्रयोगशाळा उभारू शकत नसली तरी संशयित रुग्णाचे नमुने तर घेऊ शकते, असा नाराजीचा सूर मेडिकल, मेयोच्या डॉक्टरांमध्ये उमटत आहे.