आदर्श लोकांची नक्कल करून सकाळी लवकर उठता? असं अजिबात करू नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 10:23 IST2019-06-07T10:16:12+5:302019-06-07T10:23:41+5:30
अॅपलचे सीईओ टिम कुक दररोज सकाळी ४ वाजता उठतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टॅम्प यांनी २००४ मध्ये आलेल्या त्यांच्या पुस्तकात सांगितले होते की, ते रात्री केवळ ४ तास झोप घेतात.

आदर्श लोकांची नक्कल करून सकाळी लवकर उठता? असं अजिबात करू नका!
(Image Credit : telegraph.co.uk)
अॅपलचे सीईओ टिम कुक दररोज सकाळी ४ वाजता उठतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टॅम्प यांनी २००४ मध्ये आलेल्या त्यांच्या पुस्तकात सांगितले होते की, ते रात्री केवळ ४ तास झोप घेतात. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी दररोज सकाळी ४ वाजता जिममध्ये पोहोचतात. या सगळ्या हायप्रोफाइल व्यक्तीसारखं यशस्वी होण्यासाठी आपल्या शरीराला त्रास देऊन क्षमता वाढवण्याची गरज असते, असं तुम्हाला वाटतं का?
(Image Credit : The Economic Times)
हायप्रोफाइल लोकांसारखं यशस्वी होण्यासाठी जगभरातील लोक भलेही सकाळी उठण्याची वकिली करत असले तरी असा डेटा कुठेही नाही, ज्यातून हे दाखवलं जाईल की, यशस्वी लोक कमी झोपतात. अमेरिकेत सरासरी नागरिकांचं सांगायचं तर प्रत्येक व्यक्ती दर रात्री केवळ ७ तास झोपतात. हे तास अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन द्वारे सांगण्यात आलेल्या झोप घेण्याच्या तासांपेक्षा कमी आहे.
कमी झोपल्याने या समस्या होतात
२००३ मध्ये एका रिसर्चमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासकांनी ४ तास झोप घेणाऱ्या आणि ६ तास झोप घेणाऱ्यांच्या संज्ञानात्मक कार्यात प्रदर्शन आणि रिअॅक्शन टाइम कसा राहिला याची नोंद घेतली. १९९९ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ शिगाकोच्या अभ्यासकांनी काही अशा लोकांवर रिसर्च केला, जे ६ दिवस सतत प्रत्येक रात्री ४ तास झोपत होते. या लोकांमध्ये स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल अधिक आढळले. तसेच त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं आणि अॅंंटीबायोटिकही कमी आढळलं.
बॉडी क्लॉकसोबत छेडछाड नुकसानकारक
तुम्हाला असं वाटत असेल की, रात्री ८ तास झोप घेतल्यावरही सकाळी ४ वाजता उठले तर तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागणार नाही? खरंतर तुम्ही किती वेळ झोपता याने काहीही फरक पडत नाही. जर तुमचं शरीर सकाळी ४ वाजता उठण्याच्या स्थितीत नसेल, जे जास्तीत जास्त लोकांचं नसतं. अशात नॉर्मल रिदमसोबत छेडछाड करणं नुकसानकारक ठरू शकतं.
मेंदू स्लीप हार्मोन मेलाटोनिनची निर्मिती करतं
तुम्ही कधी लक्ष द्याल तर तुमच्या लक्षात येईल की, आपल्या शरीरातील इंटरनल बॉडी क्लॉकला लवकर किंवा उशीर केला. तर या दोन्ही स्थितींमध्ये तुम्हाला तसंच वाटेल जसं तुम्हाला झोप पूर्ण न झाल्यावर वाटतं. मुळात शरीराची बॉडी क्लॉक आपल्या मेंदूला संकेत पाठवते की, कधी त्याला स्लीप हार्मोन मेलाटोनिन रिलीज करायचे आहेत. अशात ज्यावेळी तुमचा मेंदू मेलाटोनिन हार्मोन रिलीज करत असेल तेव्हा जर तुम्ही जबरदस्तीने उठण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला झोप येत राहणार. एनर्जी कमी जाणवेल आणि मूडही चांगला नसेल.