योग्य वेळ झोप घेतली नाही तर तुमच्या हृदयाचे ठोके कायमचे बंद पडू शकतात, संशोधनात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 03:37 PM2021-11-11T15:37:36+5:302021-11-11T15:37:46+5:30

संशोधनात असे आढळून आले आहे की हृदयविकाराचा संबंध व्यक्तीच्या झोप आणि झोपेच्या वेळेशी असतो. असा दावा करण्यात आला आहे की जर लोक मध्यरात्री किंवा खूप उशिरा झोपले तर त्यांना हृदयाची समस्या निर्माण होऊ शकते.

Study reveals the BEST time to sleep for lower risk of heart attack | योग्य वेळ झोप घेतली नाही तर तुमच्या हृदयाचे ठोके कायमचे बंद पडू शकतात, संशोधनात दावा

योग्य वेळ झोप घेतली नाही तर तुमच्या हृदयाचे ठोके कायमचे बंद पडू शकतात, संशोधनात दावा

googlenewsNext

इंग्लंडमधील एका विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात हृदयविकाराचा धोका टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की हृदयविकाराचा संबंध व्यक्तीच्या झोप आणि झोपेच्या वेळेशी असतो. असा दावा करण्यात आला आहे की जर लोक मध्यरात्री किंवा खूप उशिरा झोपले तर त्यांना हृदयाची समस्या निर्माण होऊ शकते.

अशा स्थितीत रात्री वेळेवर झोपल्यास हृदयविकाराचा झटका धोका टाळता येऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी प्रमाण वेळही सांगितली. इंग्लंड विद्यापीठाच्या संशोधकांनी १० ते ११ या वेळेत झोपण्याची शिफारस केली आहे. संशोधकांच्या मते हा काळ 'गोल्डन आवर ' आहे.

झोपेचा संबंध हृदयविकाराशी आहे
व्यक्तीच्या झोपण्याच्या वेळेशी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांच्या संबंधाचा अभ्यास इंग्लंडच्या एक्सेटर विद्यापीठात करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात समोर आलेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की जे लोक उशीरा झोपतात ते सकाळी उशीरा उठतात. अशा स्थितीत त्यांच्या शरीराचे वेळापत्रक बिघडते. त्याचा थेट परिणाम मानवी हृदयावर होतो. विशेषतः ज्या महिला उशीरा झोपतात त्यांचा हृदयावर वाईट परिणाम होतो.

जे रात्री १० ते ११ या वेळेत झोपतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो
संशोधकांनी सुचवले की रात्री लवकर झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासाठी संशोधकांनी संशोधनाच्या निकालांच्या आधारे झोपण्याची योग्य वेळही सांगितली जेणेकरून हृदयविकाराचा धोका टाळता येईल.

संशोधनाच्या परिणामात असे आढळून आले की जे रुग्ण दररोज रात्री १० ते ११ या वेळेत झोपतात त्यांना या रुग्णांशी संबंधित हृदयाच्या आजारांची सर्वात कमी प्रकरणे आढळतात. अशा स्थितीत रात्री १० ते ११ या वेळेत झोपल्यास हृदयविकार टाळता येतो. त्याच वेळी, संशोधनानुसार, जे लोक मध्यरात्रीनंतर झोपतात त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका २५ टक्क्यांपर्यंत जास्त असतो.

हे संशोधन ४३ ते ७४ वर्षे वयोगटातील ८८ हजार ब्रिटिश प्रौढांवर करण्यात आले आहे. अभ्यासासाठी, संशोधकांनी लोकांच्या हातात ट्रॅकर घातला. ज्याद्वारे त्यांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेवर लक्ष ठेवले जात होते. त्याचबरोबर त्यांच्या जीवनशैलीचीही माहिती गोळा करण्यात आली. या लोकांच्या ५ वर्षाच्या कालावधीत हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, हृदयविकाराच्या वैद्यकीय नोंदी ठेवल्या आणि त्यांची तुलना करण्यात आली.

 

 

Web Title: Study reveals the BEST time to sleep for lower risk of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.