अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला लगेच ताण येतो. आयुष्यातील दु:खद प्रसंग, धावती जीवनशैली, स्पर्धात्मक युग यामध्ये आपलं जीवन हे सतत तणावपुर्ण असतं. पण या तणावाशी सामना करायचा कसा? यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. कॅब्रियन कॉलेजच्या संशोधनानुसार ताण हलका करण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात, जे एका मिनिटात तुमचा तणाव हलका करतील. १ मिनिटात तणाव कसा दूर कराल?या उपायांनी तुम्ही १ मिनिटात तुमचा तणाव हलका करू शकता पण यासाठी तुम्हाला या उपायांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण विश्वास केल्याने याचा प्रभाव वाढतो.
स्ट्रेस टॉयतुम्ही तणाव हलका करण्यासाठी स्ट्रेस टॉयचा वापरही करू शकता. स्ट्रेस टॉयच्या मदतीने तुमचे लक्ष त्यावेळेच्या तणावपूर्ण परिस्थीतीकडून विचलित होते आणि तुम्हाला चांगले वाटू लागते.