मासिक पाळीवरील जनजागृतीसाठी स्टेफ्रीने लाँच केला खास Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 15:21 IST2020-06-01T15:18:27+5:302020-06-01T15:21:15+5:30
लॉकडाऊनदरम्यान भारतातील सुमारे दोन दशलक्ष मुलींना त्यांची पहिली मासिक पाळी येण्याची शक्यता आहे.

मासिक पाळीवरील जनजागृतीसाठी स्टेफ्रीने लाँच केला खास Video
मुंबई - स्टेफ्रीने वर्ल्ड मेनस्ट्रल हायजीन दिनाच्या निमित्ताने नवा डिजिटल व्हिडिओ लाँच केला आहे. कुटुंबांना पाळीविषयक संवादाचा दृष्टीकोन बदलण्याचे आवाहन या व्हिडीओमध्ये करण्यात आले आहे. लॉकडाऊनदरम्यान भारतातील सुमारे दोन दशलक्ष मुलींना त्यांची पहिली मासिक पाळी येण्याची शक्यता आहे. यावर आधारित स्टेफ्रीची #इट्सजस्टअपिरीयड ही फिल्म कुटुंबाना मासिक पाळीविषयी सकारात्मक आणि खुला दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन देणारी तसेच याबाबत मुलींना योग्य माहिती देऊन, त्यांच्यात आत्मविश्वास जागवणारी आहे.
कुटुंबाला घरातील मुलींशी याविषयी सहजपणे संवाद साधता यावा यासाठी स्टेफ्रीने मेनस्ट्रपीडियाशी करार केला आहे. या व्यासपीठावर मुलींसाठी मैत्रीपूर्ण पद्धतीने माहिती देणारे पिरीयड गाइड (मासिक पाळी मार्गदर्शक) देण्यात आले असून त्यात पाळी म्हणजे काय आणि ती चांगल्या प्रकारे कशी हाताळावी याविषयी सांगण्यात आले आहे. https://www.menstrupedia.com/quickguide/parents हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर लाँच करण्यात आला आहे. दरवर्षी भारतात सुमारे 15 दशलक्ष मुलींची मासिक पाळी सुरू होते, तरी 71 टक्क्यांपेक्षा जास्त मुलींना त्यांची पाळी येण्यापूर्वी त्याबद्दल काहीच माहिती मिळालेली नसते. माहिती मिळवण्यासाठी त्या मैत्रिणी किंवा शिक्षिकांची मदत घेतात, जे लॉकडाऊनमध्ये शक्य नाही.
जॉन्सन अँड जॉन्सन कन्झ्युमर विभागाचे विपणन उपाध्यक्ष मनोज गाडगीळ यांनी जागतिक मेनस्ट्रल हायजीन दिन हा आपल्या प्रत्येकासाठी तरुण मुलींचा मासिक पाळीचा पहिला अनुभव सामान्य असावा याची खबरदारी घेण्याची आठवण करून देणारा आहे. सध्याच्या वातावरणात मुलींना शिक्षिकेकडून माहिती घेणे शक्य नसल्यामुळे कुटुंबाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे असं म्हटलं आहे. मुलींना पाळीच्या पहिल्या अनुभवाला एकट्याने सामोरे जावे लागू नये यासाठी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली जाणे गरजेचे आहे. हे कॅम्पेन प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांची मुलगी किंवा बहिणीशी पाळीबद्दल महत्त्वाचा संवाद कसा सुरू करावा यासाठी काम करणार आहे.
Video
युट्यूब: https://www.youtube.com/watch?v=1loAM4QG134
फेसबुक: https://www.facebook.com/StayfreeIndia/videos/190352278826520/
इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/p/CAvCqQupA4h/?igshid=w832sjpwz274