फक्त जेवणाची चव वाढवत नाहीत तर वजनही कमी करतात 'हे' मसाले, आत्ताच ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 12:37 IST2021-09-15T12:36:49+5:302021-09-15T12:37:24+5:30
तुम्ही तुमच्या आहारात काही मसाल्यांचा समावेश करू शकता. ते केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत तर वजन कमी करण्यास देखील मदत करतात.

फक्त जेवणाची चव वाढवत नाहीत तर वजनही कमी करतात 'हे' मसाले, आत्ताच ट्राय करा
आजच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये आणि अन हेल्दी खाण्यामुळे जवळपास सर्वांचेच वजन वाढले आहे. मात्र, तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीविषयी वाढत्या जागरूकतेमुळे लोकांनी आता वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योगा आणि नियमित व्यायामासह खाण्याच्या सवयी बदलण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही तुमच्या आहारात काही मसाल्यांचा समावेश करू शकता. ते केवळ अन्नाची चव वाढवत नाहीत तर वजन कमी करण्यास देखील मदत करतात.
तुमच्या आहारात या 5 मसाल्यांचा समावेश करा
बडीशेप - आणखी एक भारतीय मसाला आहे. जो वजन कमी करण्यास मदत करतो आणि तो म्हणजे बडीशेप. भूक कमी करण्यासाठी आहारामध्ये बडीशेपचा समावेश करा. आपण ते आपल्या चहामध्ये देखील जोडू शकता. ए, सी आणि डी सारख्या जीवनसत्त्वे समृध्द असण्याव्यतिरिक्त, बडीशेप चहामध्ये अनेक अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे आपले चयापचय सुधारण्यास मदत करतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
वेलची - वेलचीमध्ये मेलाटोनिन सारखे अनेक आवश्यक घटक असतात. हे चयापचय गतिमान करण्यास मदत करते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रात्री कोमट पाण्याने वेलची खाल्ल्याने चयापचय प्रक्रिया वाढण्यास मदत होते.