शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

अरे व्वा! अंगठीद्वारे कोरोना संक्रमणाबाबत माहिती मिळवता येणार; शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 6:23 PM

CoronaVirus News & latest Updates : संशोधकांनी कोरोनाचा संक्रमणाबाबत माहिती  देणारी अंगठी शोधून काढली आहे. (smart ring monitors temperature) विशेष म्हणजे कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी अंगठीच्या मदतीने काळजी घेता येणार आहे.

कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक, स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या उपायांचा अवलंब केला जात आहे. तरिही अजूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रसारात आता संशोधकांनी कोरोनाचा संक्रमणाबाबत माहिती  देणारी अंगठी शोधून काढली आहे. (smart ring monitors temperature) विशेष म्हणजे कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी अंगठीच्या मदतीने काळजी घेता येणार आहे.

आजारावर उपचारांपेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेणं कधीही चांगलं ठरतं. तसेच आजाराचे लवकर निदान झाले तर उपचार करणं अधिक सोपं जातं. त्यामुळं आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशीच एक स्मार्ट अंगठी (smart ring) संशोधकांनी शोधली आहे.  ही अंगठी कशी उपयोगी ठरते जाणून घेऊया.

Coronavirus Vaccine: धक्कादायक! कोरोनाची लस घेतल्यानंतर युवकाची तब्येत ढासळली

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार ही स्मार्ट अंगठी शरीरातील तापमानाची नोंद ठेवते.थर्मामीटरपेक्षा चांगलं निदान स्मार्ट अंगठी करते. त्यामुळे वेळीच कोरोना तपासणी करणे आणि आयसोलेशनमध्ये राहणे सोपं होते. तापाची इतर लक्षणं असतील तरी रोगाचं निदान करता येते. ही अंगठी बोटात घातल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची प्राथमिक अवस्थेतच माहिती मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

रोज सार्वजनिक वाहनांचा वापर करत असाल; तर कोरोनापासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी

कोरोनासारख्या आजारांचे लवकर निदान व्हावे, यासाठी फिनलँडमधल्या ऑरा कंपनीनं ही स्मार्ट अंगठी तयार केली आहे. ही अंगठी एका मोबाईल अॅप्लिकेशनशी कनेक्ट केलेली असते. या अॅप्लिकेशनमध्ये तुम्हाला शरीराचं तापमान, हृदयाचे ठोके, श्वसनाचा वेग अशी माहिती नोंदवली जाते.  अमेरिकेतील सुमारे ३ हजार ४०० आरोग्य सेवकांना ही ऑराची स्मार्ट अंगठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देण्यात आली आहे. त्याशिवाय जगभरातील ६५ हजार लोकांनी अंगठीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या