Coronavirus Vaccine: धक्कादायक! कोरोनाची लस घेतल्यानंतर युवकाची तब्येत ढासळली

By प्रविण मरगळे | Published: December 17, 2020 03:20 PM2020-12-17T15:20:07+5:302020-12-17T15:25:11+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर संकट निर्माण झालं, आतापर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली तर लाखो लोकांचा जीव कोरोनानं गेला आहे, कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी संशोधक रात्रदिवस मेहनत घेत आहेत.

कोरोना लसीची चाचणी जगभर सुरू आहे. काही लस (Coronavirus Vaccine) त्यांचे प्रभाव दर्शवित असताना, काही लसींचे दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. आता यात फायझर लसीचे(Pfizer Vaccine) नावही जोडले गेले आहे.

अमेरिकेच्या अलास्का शहरातील एका आरोग्य कर्मचाऱ्याला फायझरची लस देण्यात आली होती, त्याला अनेक प्रकारच्या एलर्जी होऊ लागल्या आहेत. ही एलर्जी खूप गंभीर असून या आरोग्य कर्मचार्‍याला भेडसावत असलेली ही समस्या गेल्या आठवड्यात ब्रिटनमधील दोन जणांसारखीच आहे.

यूके वैद्यकीय नियामक असं म्हणतंय की, ज्या लोकांना अ‍ॅनाफिलेक्सिस आहे किंवा त्यांना कोणत्याही औषधाची किंवा काही खाद्यपदार्थाची एलर्जी आहे त्यांनी फायझर-बायोनोटॅकची Covid 19 ची लस घेऊ नये.

अमेरिकेच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने असं म्हटलं आहे की एलर्जी असलेल्या लोकांनी लसी घेण्यापूर्वी संपूर्ण संरक्षण केले पाहिजे. ज्यांना यापूर्वी एलर्जी झाली आहे या लोकांनी कोरोनाची ही लस घेण्याचं टाळलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.

अलास्का येथील एका आरोग्य कर्मचाऱ्याला जूनेच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. आपत्कालीन विभागाचे संचालक लिंडी जोन्स म्हणाले की, रुग्णाला एलर्जीची कोणतीही समस्या नव्हती. तथापि, आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

या मध्यमवयीन रूग्णवर एलर्जीचा उपचार केला गेला, त्यानंतर त्याची प्रकृती सुधारली.

फायझर म्हणाले की, आमची लस स्पष्ट इशाऱ्यासह दिली जात आहे की, ज्या लोकांना अ‍ॅनाफिलेक्सिस किंवा एलर्जीची समस्या आहे अशा लोकांनी उपचारांसाठी तयार राहणं गरजेचे आहे. गरज भासल्यास लसीची लेबलिंग भाषादेखील बदलली जाऊ शकते असं फायझर यांनी सांगितले.

या आठवड्यापासून अमेरिकेत लसीकरण सुरू करण्यात आले आहे आणि प्रथम ही आरोग्यसेवा आणि परिचारिकांना दिली जात आहे. एफडीएचे माजी मुख्य शास्त्रज्ञ जेसी गुडमन यांनी एलर्जीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली ही लस घेण्याचे असे धोके असू शकतात आणि हे समजून घेण्याची गरज आहे.

देशामध्ये कोरोना लसीकरणाला जानेवारी महिन्यात प्रारंभ होण्याची, तसेच जनजीवन येत्या ऑक्टोबरपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.

Read in English