अरे व्वा! अंगठीद्वारे कोरोना संक्रमणाबाबत माहिती मिळवता येणार; शास्त्रज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 18:28 IST2020-12-17T18:23:40+5:302020-12-17T18:28:48+5:30
CoronaVirus News & latest Updates : संशोधकांनी कोरोनाचा संक्रमणाबाबत माहिती देणारी अंगठी शोधून काढली आहे. (smart ring monitors temperature) विशेष म्हणजे कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी अंगठीच्या मदतीने काळजी घेता येणार आहे.

अरे व्वा! अंगठीद्वारे कोरोना संक्रमणाबाबत माहिती मिळवता येणार; शास्त्रज्ञांचा दावा
कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक, स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या उपायांचा अवलंब केला जात आहे. तरिही अजूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रसारात आता संशोधकांनी कोरोनाचा संक्रमणाबाबत माहिती देणारी अंगठी शोधून काढली आहे. (smart ring monitors temperature) विशेष म्हणजे कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी अंगठीच्या मदतीने काळजी घेता येणार आहे.
आजारावर उपचारांपेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेणं कधीही चांगलं ठरतं. तसेच आजाराचे लवकर निदान झाले तर उपचार करणं अधिक सोपं जातं. त्यामुळं आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशीच एक स्मार्ट अंगठी (smart ring) संशोधकांनी शोधली आहे. ही अंगठी कशी उपयोगी ठरते जाणून घेऊया.
Coronavirus Vaccine: धक्कादायक! कोरोनाची लस घेतल्यानंतर युवकाची तब्येत ढासळली
अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार ही स्मार्ट अंगठी शरीरातील तापमानाची नोंद ठेवते.थर्मामीटरपेक्षा चांगलं निदान स्मार्ट अंगठी करते. त्यामुळे वेळीच कोरोना तपासणी करणे आणि आयसोलेशनमध्ये राहणे सोपं होते. तापाची इतर लक्षणं असतील तरी रोगाचं निदान करता येते. ही अंगठी बोटात घातल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाची प्राथमिक अवस्थेतच माहिती मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
रोज सार्वजनिक वाहनांचा वापर करत असाल; तर कोरोनापासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी
कोरोनासारख्या आजारांचे लवकर निदान व्हावे, यासाठी फिनलँडमधल्या ऑरा कंपनीनं ही स्मार्ट अंगठी तयार केली आहे. ही अंगठी एका मोबाईल अॅप्लिकेशनशी कनेक्ट केलेली असते. या अॅप्लिकेशनमध्ये तुम्हाला शरीराचं तापमान, हृदयाचे ठोके, श्वसनाचा वेग अशी माहिती नोंदवली जाते. अमेरिकेतील सुमारे ३ हजार ४०० आरोग्य सेवकांना ही ऑराची स्मार्ट अंगठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देण्यात आली आहे. त्याशिवाय जगभरातील ६५ हजार लोकांनी अंगठीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.