हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि घोरणं बंद करण्यासाठी ही स्लीपिंग पोजिशन बेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 11:30 AM2019-01-21T11:30:25+5:302019-01-21T11:30:42+5:30

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, तुमची झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकते. पण अनेकांना याची कल्पनाच नसते की, याकडे कुणी फार गंभीरतेने बघतच नाहीत.

Sleeping on your left side is beneficial for health | हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि घोरणं बंद करण्यासाठी ही स्लीपिंग पोजिशन बेस्ट!

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि घोरणं बंद करण्यासाठी ही स्लीपिंग पोजिशन बेस्ट!

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, तुमची झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकते. पण अनेकांना याची कल्पनाच नसते की, याकडे कुणी फार गंभीरतेने बघतच नाहीत. प्रत्येक व्यक्तीची एक स्लीपिंग पोजिशन असते, जी त्यांची पसंतीची असते. त्या पोजिशनमध्ये झोपल्याने त्यांना चांगली झोप येते. पण आयुर्वेदानुसार, एक अशी स्लीपिंग पोजिशन आहे, ज्याने तुम्हाला चांगली झोप तर येईलच सोबतच आरोग्यही चांगलं राहील. आयुर्वेदानुसार, लेफ्ट साइडला म्हणजे डाव्या कुशीवर झोपणे बेस्ट स्लीपिंग पोजिशन आहे. चला जाणून घेऊ याचे फायदे....

हृदय राहणार निरोगी

आपलं हृदय हे डाव्या बाजूला असतं आणि जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो, तेव्हा ग्रॅव्हिटीमुळे हृदयला फायदा होतो. म्हणजे तुम्ही झोपलेला असाल तेव्हा हृदयावर काम करण्याचं ओझं कमी होतं. त्यामुळे हृदय अधिक चांगल्याप्रकारे काम करतं आणि निरोगी राहतं. 

पचनक्रिया मजबूत होते

जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा ग्रॅव्हिटीच्या मदतीने शरीरातील वेस्ट सहजपणे छोट्या आतड्यांमधून मोठ्या आतड्यांमध्ये पोहोचतं. आणि जेव्हा तुम्ही सकाळी झोपून उठता तेव्हा तुम्हाला फ्रेश होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यामुळे शरीराची पचनक्रिया मजबूत होते. 

घोरण्यापासून सुटका

तुम्हाला भलेही यावर विश्वास नसेल पण हे खरं आहे की, डाव्या कुशीवर झोपल्यास तुमची घोरण्याची सवयही कमी होते. किंवा असही होऊ शकतं की, तुमचं घोरणं बंद व्हावं. याचं कारण हे आहे की, डाव्या कुशीवर झोपल्याने जीभ आणि कंठ दोन्ही न्यूट्रल पोजिशनमध्ये असतात. ज्यामुळे आपले एअरवेज क्लिअर असतात आणि आपण सहजपणे मोकळा श्वास घेऊ शकतो.

गर्भवती महिलांसाठी चांगलं

तज्ज्ञांनुसार, गर्भवती महिलांसाठीही डाव्या कुशीवर झोपणे चांगलं असतं. कारण असे केल्याने त्यांच्या पाठीवर पडणारा भार कमी होतो. सोबतच त्यांच्या गर्भाशयात आणि फीटसपर्यंत ब्लड फ्लो वाढतो. तसेच ही स्लीपिंग पोजिशन आरामदायी करण्यासाठी गर्भवती महिलांनी गुडघे थोडे फोल्ड करावे आणि दोन्ही पायांच्या मधे एक उशी घ्यावी. याने तुम्हाला आराम मिळेल. 

कसं झोपू नये?

योग्य पद्धतीने झोपल्यास आराम तर मिळतोच सोबतच मसल्समधील ताण आणि शरीरातील दुखण्यापासून आराम मिळतो. हेल्थ एक्सपर्टनुसार, काहीही झाले नसले तरी अनेकांना अंगदुखीचा त्रास होत असतो. याचं एक कारण म्हणजे झोपण्याची चुकीची पद्धत आहे.

पोटावर झोपणे :  हेल्थ एक्सपर्ट हे नेहमीच पोटावर झोपण्याला सर्वात धोकादायक असल्याचं सांगतात. पोटावर झोपल्याने मानेला त्रास होतो. अशाप्रकारे झोपल्यास पाय आणि हात सुन्न होतात. सोबतच नसांनाही याने त्रास होतो. 

पाठिवर झोपणे : झोपण्यासाठी सर्वात चांगली पद्धत म्हणजे पाठिवर झोपणे आहे. अशाप्रकारे झोपल्या खांदेदुखी आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो. पण जर तुम्हाला घोरण्याती सवय असेल तर पाठिवर झोपणे त्रासदायक ठरु शकतं. असे झोपल्यास तुम्हाला श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते. 

हातांना डोक्याखाली घेऊन :  काही लोकांना हात-पाय पसरुन झोपण्याची सवय असते. पण हातांना डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय असते जी फार चुकीची आहे. याने हातांच्या नसा दबण्याची भीती असते. 

 

Web Title: Sleeping on your left side is beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.