ब्रेकफास्ट न केल्याने वाढतो ब्रेन डॅमेजचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 10:19 IST2019-09-09T10:11:24+5:302019-09-09T10:19:41+5:30
शरीराचं नियंत्रण केंद्र असलेल्या मेंदूला जेव्हा इजा होते, तेव्हा तुमचे विचार, स्मृति, संवेदना आणि व्यक्तिमत्वही गंभीर रूपाने प्रभावित होतात.

ब्रेकफास्ट न केल्याने वाढतो ब्रेन डॅमेजचा धोका!
(Image Credit : misskyra.com)
ब्रेन डॅमेज होणं ही एक जखम आहे. जी मेंदूतील पेशींच्या विनाशाचं कारण ठरते. शरीराचं नियंत्रण केंद्र असलेल्या मेंदूला जेव्हा इजा होते, तेव्हा तुमचे विचार, स्मृति, संवेदना आणि व्यक्तिमत्वही गंभीर रूपाने प्रभावित होतात. या गोष्टी टाळण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वाढत्या वयासोबतच निरोगी जीवनशैली फॉलो करणं गरजेचं आहे. जेणेकरून शरीरासोबतच मेंदूही निरोगी राहील.
मिठाचं जास्त सेवन
जामा न्यूरॉलजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, मिठाचं अधिक सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका अधिक वाढतो. ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होण्यासोबतच ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढतो. स्ट्रोकचा हा धोका मेंदूला फार गंभीर नुकसान पोहोचवू शकतो.
ब्रेकफास्ट न करणे
रिसर्चमधून समोर आलं आहे की, ब्रेकफास्ट स्किप केल्याने तुमच्या मेंदूला योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळत नाहीत. तसेच संज्ञानात्मक कार्यावरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो. याने ब्रेन डॅमेजचा धोका वाढतो.
मोबाइलचा अधिक वापर
वेगवेगळ्या रिसर्चमध्ये पुरूषांची झोपेची समस्या आणि तणावाची लक्षणे यासाठी मोबाइल फोनच्या अधिक वापराचा संबंध जोडला जातो. एम्सकडून करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मोबाइल फोनच्या किरणांमध्ये जास्त वेळ राहिल्याने किंवा संपर्कात आल्याने ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो.
झोपेची कमतरता
WHO द्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असे आढळले की, पुरेशी झोप न झाल्याने मेंदूचा फार नुकसान होतं आणि यामुळे अल्झायमरसारखा आजार होऊ शकतो. झोप मेंदूला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा संकेत देते. हे विषारी पदार्थ आपण जागे असताना शरीरात तयार होतात. पण पुरेशी झोप न घेतल्यास ही प्रक्रिया होत नाही आणि याचा मेंदूवर वाईट प्रभाव पडतो.
ओव्हरइटींगचे नुकसान
ओव्हरइटींगने केवळ तुमचं वजन वाढतं असं नाही तर याने मेंदूचं कार्यही कमी होतं. २०१२ मध्ये अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या वार्षिक बैठकीत सल्ला देण्यात आला की, कॅलरीचं दिवसेंदिवस अधिक सेवन केल्याने व्यक्तीमध्ये स्मृती हानीचा धोका वाढवतं.