मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय, एकदा कराच मग बघा कमाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 14:10 IST2022-10-08T14:10:33+5:302022-10-08T14:10:40+5:30
Dark Neck : काळ्या मानेमुळे तुम्हाला अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो तर यामुळे कपडेही खराब होतात. त्यामुळे मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय, एकदा कराच मग बघा कमाल...
Dark Neck : अनेकजण आपला चेहरा चमकवण्यासाठी वेगवेगळ उपाय करत असतात. पण मानेवरील काळपटपणा घालवण्याकडे फारसं कुणाचं लक्षच नसतं. त्यामुळे मान आणखी काळी होते. काळ्या मानेमुळे तुम्हाला अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो तर यामुळे कपडेही खराब होतात. त्यामुळे मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
बेकिंग सोडा
दोन चमचे बेकिंग सोडा पाण्यात मिश्रित करुन एक सेमी लिक्वीड मिश्रण तयार करा. ते मानेवर लावून काही वेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. काही दिवस हा उपाय केल्यास मानेवरील काळे डाग दूर होतील.
कच्ची पपई
कच्ची पपई कापून त्याचे जाडसर तुकडे करा. त्यात गुलाब जल आणि एक चमचा दही मिश्रित करुन पेस्ट तयार करा. हे मिश्रण मानेवर लावून कोरडे होईपर्यंत ठेवा. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास फायदा होईल.
लिंबू आणि मध
लिंबू आणि मध चांगल्याप्रकारे एकत्र करुन हा पॅक मानेवर लावा. काही वेळ ते तसेच ठेवा. आंघोळ करताना मान चांगली स्वच्छ करा. असे केल्याने मानेवरील काळ्या सुरकुत्याही दूर होतील.
लिंबू
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे ते नॅच्युरल ब्लीचसारखं काम करतं. आंघोळ करताना लिंबू हळुवारपणे मानेवर घासा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास काळे डाग जातील.