शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भावा, सलग चार तास बसणे, सिगारेट ओढण्याइतकेच धोक्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:29 IST

कामाचा ताण एवढा असतो की त्यांना त्या कामातून १० मिनिटे उठायला वेळ मिळत नाही. मात्र, या सगळ्या प्रकारचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन लठ्ठपणासारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

मुंबई :  काही नागरिक विशेष करून सध्याचे तरुण बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामाला आहेत, ते सलग ४-६ तास बसून काम करत असतात. कामाचा ताण एवढा असतो की त्यांना त्या कामातून १० मिनिटे उठायला वेळ मिळत नाही. मात्र, या सगळ्या प्रकारचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन लठ्ठपणासारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

व्यायामाचा अभाव, त्याशिवाय एकाच जागी बसून काम करणे, अतिप्रमाणात जंक फूडचे  सेवन या विचित्र जीवनशैलीचा परिणाम अनेकदा हृदयावर होताना दिसून येतो. त्यामुळे अशा पद्धतीने एकाच ठिकाणी  अनेक तास काम करत बसणे  हे सिगारेट ओढण्याइतकेच धोकादायक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचे वय कमी झाले आहे. दहा वर्षांपूर्वी सर्वसामान्यत: हृदय विकार ५० ते ५५ वर्षांच्या पुढील व्यक्तींना होत असे. मात्र, सध्या हृदयविकार तरूणपणात बळावल्याचे दिसत आहे. ३० ते ३५ वयोगटातील तरुणांना हृदयाच्या विकारांमुळे रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे जेव्हा कॉर्पोरेट कंपनी या वयातील तरुणास जेव्हा कामावर रुजू होण्यास सांगते त्यावेळी त्याच्या वैद्यकीय तपासण्या करून घेत असते. यामध्ये हृदयाच्या तपासण्याही ते करून घेत असतात.

हायपरटेन्शनमुळे विविध आजार जडण्याची भीती सलग बसून काम केल्याने आणि कुठलीही शारीरिक हालचाल न केल्यामुळे या तरुणांमध्ये लठ्ठपणा वाढताना दिसत आहे. त्यामुळे मधुमेह आणि अतिताणाच्या कामामुळे हायपरटेन्शनच्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यातूनच हृदयविकाराच्या व्याधी सुरू होतात. अनेकवेळा डॉक्टर सल्ला देत असतात एका ठिकाणी जास्त वेळ बसून काम करू नका. काही जण बसून त्याच ठिकाणी धूम्रपान करतात त्याचाही थेट हृदयविकाराशी संबंध आहे.

माहिती तंत्रज्ञान, जाहिरात आणि व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना एकाच ठिकाणी  बसून काम करावे लागते. यामुळे डोळ्यांचे विकारही बळावू शकतात.  त्यामुळे अशा व्यक्तींनी प्रथम शरीराला व्यायामाची सवय लावली पाहिजे. आरोग्यदायी नसलेल्या या आधुनिक जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज आहे. 

चाळीशीनंतर हृदय वेळोवेळी तपासून घ्यायलाच हवेसतत छातीत दुखणे, छातीतून हात, मान, पाठ, पोट याकडे जाणाऱ्या मार्गात दुखणे, चक्कर येणे, खोकल्याची उबळ येऊन जोरजोरात श्वास घ्यावा लागणे, दरदरून घाम येणे, अस्वस्थ वाटणे, अशी काही लक्षणे दिसत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. वयाच्या चाळीशीनंतर  हृदयाची तपासणी करून घेतली पाहिजे.

रोज ३० मिनिटे चाला- दररोज ३० मिनिटे वेगाने चालणे हा एक हृदयाची काळजी घेण्याचा चांगला उपाय आहे. - संतुलित आहारासोबत व्यायाम करणे. मात्र व्यायामाचा अतिरेक नको. आपल्या शारीरिक प्रकृतीनुसार व्यायाम करणे ज्यामुळे शरीराला कुठलीही दुखापत होणार नाही याची काळजी घेणे. - आहारात मीठ कमी घेणे, जंकफूड खाऊ नये. रस्त्यावरील तळलेले  कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नयेत.- डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास तसेच संतुलित आहार घेतल्यास आजार जवळपास फिरकणारही नाहीत.

टॅग्स :Healthआरोग्य