शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शरीर प्रमाणापेक्षा जास्त तापतंय याचे काही मुख्य संकेत, पाहा बॉडी ओव्हरहीट दूर करण्यासाठी काय कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:03 IST

Signs Of Body is Overheating : शरीर ओव्हरहीट होत असेल तर शरीर काही संकेत देतं, जे ओळखून आपण वेळीच आराम मिळवू शकता.

Signs Of Body is Overheating :  दिवसेंदिवस वाढत चाललेला उन्हाचा पारा वेगवेगळ्या समस्यांचा कारण बनतोय. जास्तवेळ उन्हात राहिल्याने किंवा शरीराला पुरेसं पाणी न मिळाल्याने शरीराचं तापमान वाढतं म्हणजे शरीर ओव्हरहीट होतं. ज्यामुळे आपल्याला हीट स्ट्रोक किंवा इतरही अनेक समस्या होऊ शकतात. पण अनेकदा लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतात. शरीर जर ओव्हरहीट होत असेल, तर याची वेळीच ओळख पटवणं फार महत्वाचं ठरतं. जेणेकरून योग्य ते उपाय करता येतील. शरीर ओव्हरहीट होत असेल तर शरीर काही संकेत देतं, जे ओळखून आपण वेळीच आराम मिळवू शकता.

जर आपण या शरीर ओव्हरहीट होणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. अशात हे संकेत काय असतात हे आपण पाहणार आहोत, जेणेकरून योग्य ते उपाय करता येतील. 

शरीर ओव्हरहीट होण्याचे संकेत

जास्त घाम

शरीराचं तापमान वाढल्यावर घाम येणं ही एक सामान्य बाब आहे. पण जर नेहमीपेक्षा जास्त घाम येत असेल तर समजा की, शरीर ओव्हरहीट होत आहे. 

डोकेदुखी आणि चक्कर

उन्हाळ्यात डोकं जड होणे आणि चक्कर येणे हे शरीराच्या हीट स्ट्रेसची लक्षणं आहेत. जर असं होत असेल तर उन्हात जाणं टाळा आणि शरीर थंड ठेवण्यासाठी आराम करा.

त्वचा लाल किंवा गरम होणे

त्वचा जर लाल दिसत असेल, लाल चट्टे आले असतील किंवा त्वचेची जळजळ होत असेल तर शरीर उष्णतेमुळे प्रभावित होत आहे असं समजा. वेळीच एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि योग्य ते उपाय करा.

थकवा आणि कमजोरी

जास्त तापमानामुळे ओव्हरहीट झालेल्याला शरीरात लवकर थकवा येतो आणि स्नायूंमध्ये कमजोरी जाणवते. अशात भरपूर पाणी प्या आणि आराम करा.

मळमळ किंवा उलटी

ऊन लागलं असेल किंवा शरीर ओव्हरहीट झालं असेल तर मळमळ होऊ लागते आणि उलटीही होऊ शकते. अशात हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घेऊन योग्य तो उपाय करा.  

काय उपाय कराल?  

- हळूहळू थंडगार नव्हे तर साधं किंवा गारसर पाणी प्या. शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

- मान, कपाळ, बगल, मनगट यावर ओल्या कापडाची पट्टी ठेवा. यामुळे तापमान कमी होण्यास मदत होते.

- घट्ट, जाड किंवा गरम कपडे सैल करा. हलके आणि सैल कपडे घाला.  

- धावपळ, व्यायाम किंवा मेहनतीचं काम लगेच थांबवा. शांत बसून शरीराला विश्रांती द्या.   

- घाम जास्त आला असेल तर ORS किंवा इलेक्ट्रोलाइट पेय उपयोगी ठरू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Body Overheating: Key Signs and Effective Cooling Strategies Explained

Web Summary : Excessive heat can cause body overheating, leading to heatstroke. Recognize signs like heavy sweating, headache, red skin, fatigue, nausea. Cool down by drinking water, applying cold compresses, wearing loose clothing, resting, and consuming ORS.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यHeatwaveउष्णतेची लाटHeat Strokeउष्माघात