कांदा खाण्याचे फायदे तर माहीत असतीलच, आता जास्त कांदा खाण्याचे नुकसाही जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 13:21 IST2022-07-11T13:21:17+5:302022-07-11T13:21:34+5:30
Side Effects of Onion: कांद्याचं अधिक प्रमाणात सेवन करणं सुद्धा आरोग्याला नुकसानकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊ कांद्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला काय काय नुकसान होतात.

कांदा खाण्याचे फायदे तर माहीत असतीलच, आता जास्त कांदा खाण्याचे नुकसाही जाणून घ्या
Side Effects of Onion: कांद्याचे पदार्थांना टेस्ट देण्यासोबतच आरोग्याला किती फायदे होतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण ज्याप्रकारे कोणत्याही गोष्टीची अति करणं नुकसानकारक असतं. तसंच कांद्याचं अधिक प्रमाणात सेवन करणं सुद्धा आरोग्याला नुकसानकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊ कांद्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला काय काय नुकसान होतात.
कांद्यात जास्त काय असतं?
कांद्यामध्ये ग्लूकोज आणि फ्रॅक्टोज जास्त प्रमाणात असतं. याशिवाय यात फायबरचं प्रमाणही जास्त असतं. जे सगळेजण चांगल्याप्रकारे पचवू शकत नाही. त्यामुळे अॅसिडीटीची समस्याही होऊ शकते.
ब्लड शुगरच्या रूग्णांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या
ब्लड शुगरसाठी कच्चा कांदा फायदेशीर नाही. सर्वांनाच माहीत आहे की, डायबिटीसच्या रूग्णांना कोणत्याही पदार्थाचं सेवन काळजीपूर्वक करावं लागतं. अशात कच्चा कांदा खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. नाही तर तुम्हाला समस्या होऊ शकते.
छातीत जळजळ
जर तुम्हीही जास्त प्रमाणात कच्चा कांदा खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण याने तुमच्या समस्या वाढू शकतात. याने छातीत जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. म्हणजे कच्चा कांदा जास्त खाणं टाळा.
तोंडाची दुर्गंधी
जास्त कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी येते. अशात चार चौघात तुम्हाला लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जास्त कच्चा कांदा खाणं टाळता येईल.